Type Here to Get Search Results !

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विकासाची भेट! प्रभाग क्रमांक २० मध्ये रस्ते विकासाचे भूमिपूजन




मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विकासाची भेट! प्रभाग क्रमांक २० मध्ये रस्ते विकासाचे भूमिपूजन




अभय वार्ता/ धाराशिव


भाजपा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक २०, अण्णाभाऊ साठे नगर येथे विकासकामांसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रस्ते विकास प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन मल्हार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात मल्हार पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.


प्रभाग क्रमांक २० मधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरोत्थान महाअभियानातून सुरू होत असलेल्या या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर होणार असून, अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


यावेळी मल्हार पाटील यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामाजिक समता, परिवर्तन आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी अण्णाभाऊ साठे यांनी दिलेल्या विचारांचा आदर्श समाजाने कायम जपला पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.


वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नगर परिषदेतील पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे, बापू पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मल्हार पाटील यांचा सत्कार केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच पेढा भरवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रेम, सन्मान आणि आत्मीयतेमुळे आपण भारावून गेलो असून, नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास हीच आपल्या कार्याची खरी प्रेरणा असल्याचे मल्हार पाटील यांनी सांगितले.


“विकासाची वाटचाल आणि जनतेची सेवा हेच माझ्या वाढदिवसाचे खरे औचित्य आहे,” असे सांगत त्यांनी विकासकामांना प्राधान्य देण्याचा आपला निर्धार पुन्हा व्यक्त केला. वाढदिवस हा केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.


या रस्त्याचा विषय तब्बल २० ते २५ वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर हा प्रश्न मार्गी लागल्याने प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक विलास लोंढे, वंदना पवार तसेच मल्हार पाटील यांचे आभार व्यक्त केले. यापुढील काळातही प्रभाग क्रमांक २० मधील उर्वरित विकासकामे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून, या भागात विकासाची गंगा अशीच अखंड वाहत राहील, असा विश्वास मल्हार पाटील आणि पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांनी व्यक्त केला.


या कार्यक्रमास बांधकाम सभापती अभिजित काकडे, नियोजन सभापती आकाश तावडे, शिक्षण सभापती प्रवीण माळी, स्वच्छता सभापती अक्षय ढोबळे, नगरसेवक राहुल काकडे, वंदना पवार, दाजी आप्पा पवार, धनंजय पाटील, बापू पवार यांच्यासह प्रभाग क्रमांक २० मधील असंख्य नागरिक उपस्थित होते.


विकासकामांचे भूमिपूजन, सामाजिक उपक्रम, नागरिकांशी संवाद आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका अशा विविध उपक्रमांनी प्रभाग क्रमांक २० मध्ये मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण आणि समाजाभिमुख वातावरणात साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments