Type Here to Get Search Results !

अवैध धंदे बंद करण्याची मागणी; जिल्हा परिषद सदस्यांचे राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन

अवैध धंदे बंद करण्याची मागणी; जिल्हा परिषद सदस्यांचे राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन







अभय वार्ता/ धाराशिव

जयनारायण दरक 


 कळंब तालुक्यातील नायगाव येथे सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांमुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत, संबंधित अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य उद्धव (राजाभाऊ) बाजीराव शितोळे पाटील यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की नायगाव येथे अवैध धंदे सुरू आहेत व नायगाव येथील काही व्यक्ती गावातील रस्त्यावर तसेच शाळेसमोर दारू विक्री करत फिरत आहेत या मुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तसेच याचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांना ही होत आहे.अवैध प्रकारांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून, विशेषतः शालेय विद्यार्थी आणि युवकांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ठिकाणी तातडीने तपासणी मोहीम राबवावी आणि अवैध धंदे बंद करण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या निवेदनानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. स्थानिक नागरिकांनीही अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


१) स्थानिक पोलिसांची उदासीनता : गावात सर्रास पने दारू विक्री होत असताना पोलीस डोळेझाक करत असल्याचा स्थानिक नागरिकांतून सूर येत आहे

 

२) दोन दिवसापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षा कडे केली होती तक्रार : दोन दिवसापूर्वी शिराढोण येथे जिल्हा परिषद अध्यक्षांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रमा नंतर नायगाव येथील काही लोकांनी अधीक्षकांकडे तक्रार केली होती त्या वेळी अध्यक्ष यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना या बाबत विचारणा करत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते पण काही कारवाई न झाल्याने संबंधित निवेदन उत्पादन शुल्क विभागाला दिले.

========================================




















Post a Comment

0 Comments