Type Here to Get Search Results !

कळंबमध्ये गुटखा माफियांवर पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक'! डिकसळ येथील घरातून तब्बल ₹५९.२३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य साठा जप्त; गुटखा रॅकेटचा पर्दाफाश!

कळंबमध्ये गुटखा माफियांवर पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक'! डिकसळ येथील घरातून तब्बल ₹५९.२३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य साठा जप्त; गुटखा रॅकेटचा पर्दाफाश!





अभय वार्ता / धाराशिव 

जयनारायण दरक 



कळंब तालुक्यात अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत धाराशिव पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे.

 महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा तब्बल ₹५९,२३,१२८ किंमतीचा साठा डीकसव येथील एका घरातून जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परी. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत ही मोठी कारवाई करण्यात आली.


गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी डिकसळ येथील प्रभाकर भैरुबा चौधरी यांच्या घरातील एका खोलीवर पंचांसमक्ष छापा टाकला. खोलीत प्रवेश करताच विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा मोठा साठा आढळून आला. चौकशीत सदर खोली गणेश भिकाजी घेवारे यांना भाड्याने दिल्याचे निष्पन्न झाले असून, जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल त्यांचाच असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

आरोग्याशी खेळणाऱ्या गुटखा माफियांना जबर धक्का!

छाप्यात सम्राट, गोवा 1000, तारा, सिग्नेचर, ॲक्शन-7, के.आर.1000, रत्नछाप, माणिकचंद, शिमला, झाफरानी जर्दा, एम.सी., ए.बी., अलीबाबा, टी.टी.एस., व्ही.टी., जायका, सोसायटी पान मसाला आणि इतर विविध कंपन्यांच्या हजारो पुड्यांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे गुटखा विक्रीच्या अवैध साखळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

  या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आणखी मोठ्या रॅकेटकडे पोहोचते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


कारवाईत सहभागी अधिकारी

या यशस्वी कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे, सिराज पठाण, तसेच RCP, QRT पथकातील अधिकारी-कर्मचारी आणि कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी मोलाची भूमिका बजावली.


=========================================


















Post a Comment

0 Comments