भाजपाचे उमेदवार माजी मंत्री बसवराज पाटील यांचा विक्रमी मतांनी विजय !
अभय वार्ता/धाराशिव
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विक्रमी विजय मिळविला आहे. पाटील यांना एकूण 845 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार देशमुख यांना 124 मते मिळाली. त्यामुळे बसवराज पाटील यांनी तब्बल 721 मतांच्या फरकाने विजय मिळवत मतदारसंघात वर्चस्व सिद्ध केले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, धाराशिव येथील भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), तुळजापूर रोड येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि सुरळीतरीत्या पार पडली. निवडणुकीच्या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत बसवराज पाटील यांचे अभिनंदन केले. या विजयामुळे उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात भाजपची ताकद अधिक बळकट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Post a Comment
0 Comments