दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 2 मे 2026 | शनिवार
इराण म्हणाले- अमेरिकेच्या प्रत्येक चुकीच्या कृतीला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल: त्यांना कोणताही करार मान्य नाही, त्यांची आश्वासने केवळ दिखावा
लाडकी बहीण योजनेला मोठा ब्रेक: सरकारचा कडक निर्णय; 54 लाख महिलांना योजनेतून बाहेरचा रस्ता, केवायसी न केल्याचा फटका
पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय: प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्यूदंड होईल याची काळजी घेतली जाईल – CM
बारावीचा निकाल जाहीर, राज्याच्या निकाल 89.79 टक्क्यांवर घसरला, पाच वर्षातील सर्वात कमी टक्के निकाल
कॉपीमुक्त मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे बारावीच्या निकालात घट, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांची माहिती
धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं
एकनाथ शिंदेंना परिस्थितीची आधीच माहिती दिली होती, त्यांनी बोलावल्यास भेटायला जाणार, सातारा जिल्हा परिषद प्रकरणावर आमदार महेश शिंदेंची प्रतिक्रिया
आर्थिक गणित महत्त्वाचं असतं, त्यामुळे पुढे काय होईल सांगता येत नाही, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधवांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
अशोक खरात प्रकरणात 70 कोटी रूपयांच्या घोस्ट अकाऊंटचा भांडाफोड, पुढील आठवड्यात ईडीकडून प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची चौकशी होणार
राजा शिवाजी एक अजरामर कलाकृती, चित्रपट पाहिल्यानंतर IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील भारावले
जातीची गोष्ट केली, तर जोरात लाथ घालेन: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विधान; देशात कुणाशीही कोणताही भेदभाव होत नसल्याचा दावा
देशभरात कोट्यवधी मोबाईलवर एकाच वेळी आला अलर्ट मेसेज: सायरनचा आवाज ऐकू आला, आपत्कालीन विभागाने चाचणी केली.
बंगालमध्ये 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान: दक्षिण 24 परगणामध्ये BJP-TMC कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष; फालतामध्ये लोकांचा टीएमसी कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
नाशिक टीसीएस प्रकरण: निदा खानच्या अडचणीत वाढ, जिल्हा कोर्टाने अंतरिम जामीन फेटाळला; गर्भावस्थेचे कारण ठरवले अमान्य
लालपरीचा प्रवास महागणार: स्वच्छतेसाठी प्रवाशांवर 2 रुपयांचा अधिभार आणि मोफत शौचालये; एसटीत मोठे बदल जाहीर
2029 ला भाजप – शिवसेना स्वतंत्रपणे लढू शकते: राजकारणात बाँड किंवा ॲग्रीमेंट काहीही नसते, संजय शिरसाट यांच्या दाव्याने खळबळ
जनतेने नाकारले म्हणून नेत्याकडे गेलो!: माझी निवडून येण्याची क्षमता नव्हती हे मान्य, संजय राऊतांच्या टीकेला बच्चू कडूंचे उत्तर
‘राजा शिवाजी’ प्रदर्शित; रितेश देशमुखने केली एक विनंती: ‘कृपया चित्रपट पाहताना व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड करू नका’
चित्रपट हेरा फेरीच्या हक्कांसंदर्भात फसवणुकीचा गुन्हा: फिरोज नाडियाडवाला यांचा दावा- ₹4.5 लाखांना हक्क विकत घेतले; प्रदर्शनापूर्वी पैसे उकळले
पाकिस्तानी म्हणाले- वैभवच्या बॅटमध्ये AI चिप: सूर्यवंशीचे उत्तर- देवाने लावून दिली आहे; त्यांनी वरच सांगितले होते- याचाच वापर करा
कर्णधार हरमन, तर मानधनाकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी, महिला टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, पहिलाच सामना पाकिस्तानशी
IPL- चेन्नई Vs मुंबई: एमआयने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली, रघु शर्मा पदार्पण करतोय
=======================================
.jpg)
Post a Comment
0 Comments