Type Here to Get Search Results !

सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार

सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार




विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर, 12 मे रोजी मतदान अन् निकाल; प्रज्ञा सातव यांच्या जागेवर पोटनिवडणूक, तर स्थानिक स्वराज संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांचाही मार्ग मोकळा  


विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, 10 उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, महायुतीचा एका जागेवरील विजय जवळपास निश्चित 


महिला आरक्षण लागू करण्यासाठी कालपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; दिल्लीत ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ विधेयकावर चर्चा 


तामिळनाडू आणि यूपीमधील खासदारांचा फरक 40 वरुन 61 वर, निवडणूक आणि मतदारसंघ पुनर्रचना आयोग सुद्धा यांच्या खिशात, जसा हवा तसा बदल करतील; कपिल सिब्बलांनी नारी शक्ती विधेयकावरुन दक्षिण विरुद्ध उत्तर भारताचा धोका मांडला


महाराष्ट्रात उष्णतेची लाट: विदर्भात सूर्याचा प्रकोप, अकोल्याचा पारा 44 अंश पार, जगातील उष्ण शहरांच्या यादीत गणना; प्रशासन हायअलर्टवर


महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना संसदेत येऊ द्या; PM नरेंद्र मोदींचं संसदेत निवेदन


मोदी म्हणाले- विरोधकांनी श्रेय घ्यावे, ब्लँक चेक देण्यास तयार: प्रियंका गांधींचे उत्तर- महिला वारंवार फसवणाऱ्यांना ओळखतात, सावध रहा


उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जात असतील तरच काँग्रेसचा पाठिंबा: इतर कोणत्याही प्रस्तावावर चर्चा आवश्यक; सपकाळांचा स्पष्ट इशारा


दिल्ली विमानतळावर अकासा एअर आणि स्पाइसजेटची विमाने धडकली: पार्किंग परिसरात अपघात, दोन्ही विमानांचे नुकसान पण प्रवासी सुरक्षित


बँक फसवणूक प्रकरणात अनिल अंबानींना दिलासा नाही: SCने म्हटले- बँक खाते फसवणूक म्हणून घोषित केले जाऊ शकते, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम


रोहित पवारांकडून सुनेत्राकाकींचा प्रचार, सदाभाऊ खोतांकडून बोचरी टीका; म्हणाले, ‘पुरोगामीपणाचा खेळ मांडला, सत्तेच्या सारीपाटावर स्वयंघोषित पुरोगामी धृतराष्ट्र बनला’ 


रोहित पवारांकडून सुनेत्रा काकींचा प्रचार, पण निशाण्यावर भाजप; म्हणाले, भाजप नेत्यानं सांगितलं असतं तर करुणा शर्मांनी अर्ज मागे घेतला असता 


नांदेडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना; खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचलं, खेळताना बुडून चार लहानग्यांचा मृत्यू 


ठाण्याच्या वन विभागात महिलेसह दोन अधिकाऱ्यास अटक, 50 हजारांची मागितली लाच; एसीबीने सापळा रचून रंगेहाथ पकडलं


लग्नानंतर 2-3 महिने संसार सुखाने चालला; पत्नीसोबत बोलायला आला, पेट्रोल टाकलं, लाईटर काढून पेटवलं; सोलापुरातील हादरवणारी घटना 


नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, कंपनीची मॅनेजर आणि टीम लीडर निदा खानच सूत्रधार, 20 दिवसांपासून फरार; हादरवणारी माहिती समोर 


त्र्यंबक रोडवरील रिसॉर्टमध्ये रंगायच्या पार्ट्या, आरोपी तिथेच ओढायचे मुलींना जाळ्यात, नाशिक धर्मांतर प्रकरणात SIT च्या हाती महत्त्वाचा धागा


रविवारी आणि गुरुवारी देवी येते, शरीरातील भूत उतरवतो; मुंबईतील भोंदूबाबाचा धक्कादायक प्रताप समोर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या 


मित्राचीच रूम भाड्याने घ्यायचा; मुलींना घेऊन यायचा, नको ते करताना व्हिडीओ काढायचा; अमरावतीच्या व्हिडीओ कांडमधील धक्कादायक माहिती समोर 


पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी आण्विक वादासंदर्भातील करार घडवून आणण्याचे प्रयत्न


इराणमधील आंदोलक महिला बीता हेमातीबाबत इराणी न्यायाधीशांचा कठोर निर्णय, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुनावली शिक्षा, मानवाधिकार आयोगाचा विरोध


ग्रँडमास्टर वैशालीने बुद्धिबळ कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय महिला; तब्बल 10 वर्षांनी गैर-चिनी खेळाडूचा बोलबाला 


माजी क्रिकेटर विनोद कांबळींना ‘ब्रेन स्ट्रोक’चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, व्हॉट्सअप ग्रुपमधून निधी उभारणार


डोसा, इडली, सांबार, चटणी गाण्यावर CSK ची नाराजी: RCB विरुद्ध तक्रार दाखल केली, म्हटले- आमच्या खेळाडूंची आणि संघाची खिल्ली उडवली


20 वर्षांच्या सिंदारोव्हने विक्रमी विजयासह ‘कँडिडेट्स’ जिंकली: आता 19 वर्षीय गुकेशशी सामना; दुपारी झोप टाळण्यासाठी बुद्धिबळची निवड केली होती.

========================================



Post a Comment

0 Comments