Baramati By-Election Results: सुनेत्रा पवारांनी मोडला अजित दादांचा 2024 मधील विक्रम
तेराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना एकूण १ लाख १२हजार २६८ मतं मिळाली असून, तेराव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना ८५६९ मतं मिळाली आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचा २0२४मधील विक्रम मोडला आहे. २०२४ मध्ये अजित पवारांचा १ लाख १ हजारांनी विजय झाला होता.
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा जल्लोष
बारामती येथे पार पडलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात असताना राज्यभरात जल्लोषाला सुरुवात झाली आहे.अकोल्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील नवीन बस स्थानक चौकात सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून विजयाचा आनंद साजरा केला.या जल्लोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी बारामतीकरांचे आभारही मानले.
सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचा बारामतीमधील विक्रम मोडला
Baramati By-Election Results 2026 LIVE:
तेराव्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांना एकूण 1 लाख 12 हजार 268 मतं मिळाली आहेत. तेराव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना 8569 मतं मिळाली आहेत. सुनेत्रा पवार यांनी अजित दादांचा 2024 मधील विक्रम मोडला आहे. 2024 मध्ये अजित पवारांचा 1 लाख 1 हजारांनी विजय झाला होता.
बारामतीत सुनेत्रा पवारांचा ‘पॉवर’ शो! अजितदादांचाही रेकॉर्ड मोडला; अभिजीत बिचुकले, करुणा मुंडेंनाही मतं वाढली, जाणून घ्या आतापर्यंत काय काय घडलं?
राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली.
या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीपासूनच विरोधकांना नामोहरम करत भक्कम आघाडी घेतली आहे.
विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांनी केवळ आघाडीच घेतली नाही, तर स्वतः अजित पवार यांचा 2024 मधील विजयाचा विक्रमही मोडीत काढला आहे.
मतमोजणीच्या 14 व्या फेरीअखेर समोर आलेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांनी विजयाकडे मोठी कूच केली आहे.
सुनेत्रा पवार (एकूण मते): १,२१,८५५
इतर उमेदवार (एकूण मते): २,४६८
अजित पवारांचा विक्रम मोडीत
2024च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी 1 लाख 1 हजार मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. मात्र, पोटनिवडणुकीच्या अवघ्या 14 व्या फेरीतच सुनेत्रा पवार यांनी 1 लाख 21 हजार 855 मतांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे त्यांनी अजित पवारांचा मागील रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
=======================================

.jpg)
Post a Comment
0 Comments