Type Here to Get Search Results !

पारा गावात शिंदे गटाला भगदाड; विकास कामांचे दिलेले आश्वासन आ. डाॅ. सावंत यांनी न पाळल्यामुळे माजी सरपंच, उपसरपंच सह शेकडो समर्थकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

पारा गावात शिंदे गटाला भगदाड; विकास कामांचे दिलेले आश्वासन आ. सावंत यांनी न पाळल्यामुळे माजी सरपंच, उपसरपंच सह शेकडो समर्थकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश




 अभय वार्ता  / पारा 


राहुल शेळके


धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील मोठे असलेले आणि जिल्हा परिषद गट असलेले पारा गावात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. जवळपास पंधरा वर्षे शिवसेनेशी प्रामाणिकपणे काम करणारे आणि शिवसेना वाढवण्यासाठी झगडणारे ग्रामपंचायत मध्ये सत्ता असलेले पारा गावचे उपसरपंच अतुल भैया चौधरी यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यासहित भुम परांडा वाशी चे माजी आमदार मा .राहुल भैया मोटे यांच्या उपस्थितीत दि.5 एप्रिल रोजी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत हाती घड्याळ घेत राष्ट्रवादी पक्षात मोठ्या थाटामाटात गिरवली येथे पक्षप्रवेश केला . या वेळी अतुल चौधरी बोलताना म्हणाले की आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दोन्ही विधानसभा निवडणुकीत पारा येथे प्रचारसभेत मतदारांना अनेक मोठ मोठे आश्वासने दिली.त्यापैकी सर्वांत मोठे आश्वासन त्यांनी पारा येथील कागदंबा देवी मंदिर दर्जा उंचावणे, पारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी वर्धन करून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आरोग्य मंत्री असताना सावंत यांनी मंजूर केले होते.पारा गावात दलीत वस्ती साठी स्मशानभूमी उभारणे असे एक न अनेक महत्त्वाची कामे आ.सावंत यांनी न केल्यामुळे तसेच विधानसभा निवडणुकीत आमदार तानाजी सावंत यांना पारा गावातून 1509 मते दिली त्यामुळे पारा गावात 696 मतांची लीड असताना गेल्या जिल्हा परिषद निवडणूक मध्ये त्यांना डावलण्यात आल्याने अतुल चौधरी नाराज होते.त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि गावातून दोन क्रमांकाची मते मिळवली.त्यामुळे भूम परंडा वाशी मतदारसंघाचे माजी आमदार तथा गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष राहुल भैया मोटे आणि राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नितीन बिक्कड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक लक्षात घेत गावच्या विकासाठी , प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्यासाठी गावातील हजारो तरुण , नागरिक , मित्रमंडळी ,पदाधिकारी यांनी दि 5 एप्रिल रोजी गिरवली येथे सर्वांच्या उपस्थितीत हाती घड्याळ घेत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. येणाऱ्या काळात पारा येथे आणि वाशी तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष एक नंबर चा पक्ष होईल असा विश्वास तेरखेडा येथील बिभीषण अण्णा खामकर यांनी व्यक्त केला.


                        यावेळी पारा मा .उपसरपंच अतुल चौधरी , मा.सरपंच राजेंद्र पांडुरंग काशीद दत्तात्रय शिनगारे,अंकुश फुरडे,मीनाताई माळी ,डॉ.विष्णू मोहळकर ,चंद्रकला फुरडे,अर्जुन ढेंगळे, मोहन चौधरी,शाहू गवळी, अंगद विधाते ,प्रशांत शिनगारे ,दत्तात्रय टाचतोडे,युवा नेते अनिकेत घरत ,विलास भराटे , उद्धव भराटे ,विश्वाम्बर वैद्य ,निळकंठ शिनगारे, चंद्रकांत स्वामी, विलास भराटे,पत्रकार दत्तात्रय भराटे ,सिद्धेश्वर गोडसे ,दत्ता खोले, सुरेश चौधरी, चंद्रकांत चौधरी, राजाभाऊ कोळी , महादेव कोळी ,बाळासाहेब मोहलकर, नकुल घरत, पिंटू ढेंगळे, तुषार माने,शंकर कुरुंद ,आकाश घरत ,जीवन मस्के , लक्ष्मण उगले ,सूर्यकांत पांचाळ , शिवाजी उगले ,मिलिंद शिनगारे , सचिन भराटे ,अशोक ढाकणे , मनोज गुजर , तुषार भाकरे , संजय फुरडे , तरुण मित्र मंडळी, धाराशिव जिल्हा परिषद चे पशुसंवर्धन सभापती खरसडे , सांडसे वकील , मनीष दादा भराटे , बाळासाहेब भराटे , राजेंद्र भराटे ,सुरज शिंदे पदाधिकारी ,युवा वर्ग गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

========================================










Post a Comment

0 Comments