Type Here to Get Search Results !

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू




अभय वार्ता / कळंब


 केज तालक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज (दि.९) सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावर रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात दुरदैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण केज तालुक्यासह महसूल विभागात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


प्राथमिक माहितीनुसार, तहसीलदार गिड्डे हे स्वतः कार चालवत प्रवास करत होते. दरम्यान, अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन गंभीर अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे अपघाताच्या वेळी ते कारमध्ये एकटेच असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.



Post a Comment

0 Comments