बापाच्या क्रूरतेने बेरडवाडी हादरली! आईचा खून लेकीने पाहिल्याने केली हत्या; नंतर 3 वर्षाच्या मुलाला...पत्नी आणि मुलीचा खून झाल्याचा बनाव करत आरोपी अजित अणप्पा वासुदेव हा मुरूम पोलीस ठाण्यात पत्नी व मुलीचा खून झाला याची तक्रार देण्यासाठी गेला होता.
अभय वार्ता / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथे मंगळवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने घाव घालत खून केल्याची घटना उघडकीस आले आहे. घटनास्थळी मुलीने आईला मारताना वडिलांना पाहिले त्यामुळे पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच कुऱ्हाडीने अवघ्या 8 वर्षांच्या मुलीचा वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुलगी आणि पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याचाच तीन वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी रडत होता त्यालाही मारहाण केली. चिमुकला आपण खून केल्याचं सांगू शकत नाही असा त्याला विश्वास पटला त्यामुळे त्याने मुलाला जीवंत सोडले. पत्नी आणि मुलीचा खून झाल्याचा बनाव करत आरोपी अजित अणप्पा वासुदेव हा मुरूम पोलीस ठाण्यात पत्नी व मुलीचा खून झाला याची तक्रार देण्यासाठी गेला होता. मात्र पोलिसांना त्याचा संशय आल्याने उलट तपासणी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
=========================================
.jpg)
Post a Comment
0 Comments