Type Here to Get Search Results !

कळंब - ढोकी जिल्हा धाराशिव परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही- जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

कळंब - ढोकी जिल्हा धाराशिव परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही- जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार 




अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव


 आज दिनांक 04.02.2026 रोजी सकाळी 9.10 ते 10.00 मिनिट या सुमारास कळंब - ढोकी जिल्हा धाराशिव परिसरात भूगर्भातून गुढ आवाज होऊन भूकंप सदृश्य धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती.


सबब माहितीची जिल्हा प्रशासनाने त्वरित नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली असता त्यांचेकडून करण्यात आलेल्या तपासणीनुसार, या परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविले आहे. 


जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आवाहन केले आहे की, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये.

Post a Comment

0 Comments