Type Here to Get Search Results !

क्लब सुरू करण्यासाठी 40 हजार लाचेची मागणी - पोलीस हवालदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

क्लब सुरू करण्यासाठी 40 हजार लाचेची मागणी - पोलीस हवालदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात



 अभय वार्ता वृत्तसेवा/ धाराशिव

क्लब सरू करण्यासाठी 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राजेश महादेवराव शेळके लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले असुन गुन्हा दाखल करण्याचीं प्रक्रिया सुरू आहे. तक्रारदारास शिराढोण पोलीस हे ठाण्याच्या हद्दीत क्लब सूरू करायचा असून त्यासाठी पोलीस हवालदार शेळके यांनी स्वतःसाठी व इतर लोकसेवकांसाठी 40 हजार रूपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 8 डिसेंबर 25 रोजी लाचलचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.

तक्रारीच्या पडताळणीदरम्यान पोलीस स्टेशन शिराढोण येथे झालेल्या भेटीत शेळके यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पहिल हप्ता म्हणन 5 हजार रुपये 'साहेबांना विचारून सांगतो’ असे म्हणत स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे पडताळणीत उघड झाले.

एसीबीने 15 व 19 डिसेंबर 25 रोजी सापळा कारवाईचे प्रयत्न केले. मात्र. संबंधित पोलीस हवालदार रजेवर असल्याने तसेच मोबार्डल स्विच ऑफ असल्याने सापळा यशस्वी होऊ शकला नाहीं.. तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने पुढील संपर्क टाळला जात असल्याचे तक्रारदाराने एसीबीला कळवले. य पाश्वभूमीवर 3 फेब्रवारी 26 रोजी पोलीस हवालदार राजेश शेळके यांच्याविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 7व 7(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आरोपीच्या अंगझडतीत काहीही आढळले नसून घरझडतीची कारवाई सुरू आहे. अटक अद्याप झालेली नाही. ही कारवार्ड पोलीस उपअधीक्षक योगेश भालचंद्र वेळापुरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक विजय वगरे करीत आहेत. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांनी केले.


दरम्यान. जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शूल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी झाल्यास फ्री क्रमांक 10 64 वर संपके साधावा. असेही  तात्काळ तक्रार करावी. 

असं आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 10 64 वार संपर्क साधावा ,असेही आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments