Type Here to Get Search Results !

रांजणी येथे मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन्ही बूथवर मिळून 1665 मतदारांनी बजावला हक्क

रांजणी येथे मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन्ही बूथवर मिळून 1665 मतदारांनी बजावला हक्क




रांजणी /ताहेर पटेल 


धाराशिव : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत नायगाव गटातील रांजणी येथे मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. महिला व पुरुष मतदारांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.

बूथ क्रमांक 43 वर एकूण 848 मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये 406 महिला तर 442 पुरुष मतदारांचा समावेश आहे.

तर बूथ क्रमांक 42 वर एकूण 817 मतदान झाले असून 362 महिला व 455 पुरुष मतदारांनी आपला हक्क बजावला.

दोन्ही बूथ मिळून एकूण 1665 मतदारांनी मतदान केल्याने लोकशाहीच्या या उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. प्रशासनाच्या नियोजनामुळे मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली.

लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी दाखवलेला सहभाग कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त होत आहे.

‘आपले मत – आपल्या विकासाचा हक्क’ हा संदेश मतदारांनी प्रत्यक्ष कृतीतून साकारला.

Post a Comment

0 Comments