Type Here to Get Search Results !

सरमकुंडी क्रिकेट लीग स्पर्धेत रॉयल मित्र प्रेम क्रिकेट संघ विजयी.

सरमकुंडी क्रिकेट लीग स्पर्धेत रॉयल मित्र प्रेम क्रिकेट संघ विजयी.



 

अभय वार्ता वृत्तसेवा /वाशी 


धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रथम बक्षीस 41000 रुपये रॉयल मित्र प्रेम क्रिकेट संघ पारा या संघाने तर द्वितीय बक्षीस 31000 रुपये जय हनुमान क्रिकेट संघ सरमकुंडी, तिसरे बक्षीस 15555 रुपये मॉर्निंग क्रिकेट क्लब पिंपळगाव (क ),चतुर्थ बक्षीस 11111 रुपये फास्टर क्रिकेट क्लब सरमकुंडी संघाने पटकावले. तर मालिका वीर म्हणुन अतुल खवले याने पटकावले. या विजेत्यांना वाशी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे आणि गटविकास अधिकारी ओमकार गायकवाड याच्या हस्ते वितरण करण्यात आले.


              या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पुण्य नगरी वाशी तालुका प्रतिनिधी चे गौतम चेडे, दैनिक पुढारी चे दादासाहेब लगादे ,समय सारथी चे शोएब काझी, दै.जनमत चे राहुल शेळके हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन गायकवाड यानी केले तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शंकर तोडकर, कृष्णा शिंगणे, निखील गायकवाड, विकास गायकवाड, सुजित गायकवाड, प्रमोद गायकवाड, अशोक गायकवाड, सचिन गायकवाड, विरेश गायकवाड, भोसले प्रतीक,युवराज भाकरे, गोपी गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.


               या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस वाशी तालुक्यातील पारा येथील रॉयल मित्र प्रेम संघाने पटकावल्यामुळे संघामधील कर्णधार अतुल खवले,प्रदिप शिनगारे,प्रदिप गोडसे, बालाजी कवडे, मुन्ना शेख,गोविंद माळी, विशाल खवले, सचिन थोरबोले,जिवन मस्के,विरेंद्र मस्के,सागर मस्के,संतोष चौधरी


तर संघाचे मॅनेजमेंन्ट रोहित शेळके आणि दत्ता खोले यांनी पाहीले तसेच या संघाचे संघ प्रशिक्षक अंगद वाळके यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments