Type Here to Get Search Results !

कळंबमध्ये अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता विश्वेश्वर शिंगणापुरे, सुलोचना बिदरकर याना समाजभूषण पुरस्कार

कळंबमध्ये अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता विश्वेश्वर शिंगणापुरे, सुलोचना बिदरकर याना समाजभूषण पुरस्कार

 






अभय वार्ता वृत्तसेवा/ कळंब


 दिनांक १६ जानेवारी ते २३जानेवारी २०२६ या दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला, या सप्ताहात राष्ट्रीय शिव कथाकार, सरस्वती स्वामी, यांची शिव कथा झाली, परमरस्य पारायण ग्रंथ वाचन प्रमुख शि.भ.प.राजाभाऊ महाराज खडबड, होते, श्री.गणपती जन्मोत्सव निमित्त शि.भ.प.पद्मिनी खराडे, यांचे टाळ आरती कीर्तन झाले, मन्मथ माऊलींच्या जन्मोत्सवानिमित्त प्रसादाचे किर्तन, शि.भ.प. विश्वनाथ स्वामी महाराज पेनुरकर यांचे झाले,तसेच संपूर्ण सप्ताह काळात रोज सायंकाळी, शि.भ.प. श्री.रमेश महाराज हिरे, शि.भ.प. श्री.उमाशंकर महाराज मिटकरी, या कीर्तनकारांची कीर्तन सेवा पार पडली.

  सांगता दिवशी सकाळी ८ वाजता, ठीक ष.ब्र.१०८श्री.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर, आणि ष.ब्र.१०८ श्री. महादेव महाराज शिवाचार्य वाईकर यांच्या उपस्थितीत कलश आणि परमरहस्य ग्रंथ मिरवणूक शहरातून काढण्यात आली तद्नंतर श्री.संत शिरोमणी मन्मथ स्वामी सेवाभावी संस्थान आणि लिंगायत समाज कळंब यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी,देण्यात येणारा, समाजभूषण पुरस्कार २०२६ , हा विश्वेश्वर शिंगणापुरे, आणि सुलोचना बिदरकर यांना, विरुपाक्ष मानूरकर महाराज शिवाचार्य, महादेव महाराज शिवाचार्य वाईकर, आमदार कैलास घाडगे पाटील, राजेंद्र मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, तसेच संपूर्ण सप्ताह काळात, अन्नदान देणारे सर्व अन्नदाते व सप्ताह कार्यकर्ते यांचा सन्मान-आभार पूर्वक हार,श्रीफळ देऊन सत्कार देवस्थानच्या वतीने करण्यात आला.

 यावेळी प्रमुख उपस्थितीत लिंगायत संघर्ष समिती प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे,श्री.संत शिरोमणी मन्मथ स्वामी सेवाभावी संस्थान अध्यक्ष तथा नगरसेवक सागर मुंडे, शिशिर राजमाने, शिवाजी लोखंडे, निलेश होनराव, लक्ष्मण फल्ले, सूर्यकांत थळकरी, शितलकुमार घोंगडे, सुमित घोंगडे, शितल भडंगे, मंदिर पुजारी शैलेश स्वामी,डॉ.सुनील थळकरी, डॉ.महादेव कोरसाळे, बाळासाहेब कथले, विलास मिटकरी,प्रकाश भडंगे, शिवकुमार राजमाने,अनिल चिपाडे,मनोज साखरे, सुधीर तांबवे,अशोक स्वामी, उमेश स्वामी, ओम स्वामी परशुराम माळी, काशिनाथ धुमाळ, अर्जुन चिंचकर, कैलास बागल, दत्ता शेवडे, विशंभर किरवे,बालाजी देशमाने, भागवत किरवे, संभाजी किरवे, इत्यादी उपस्थित होते,या सप्ताह काळात ,मच्छिंद्रआप्पा साखरे, वैजिनाथ भडंगे,संजय मुंडे सोमनाथ कोल्हेकर, शैलेश खराडे, केदार खराडे, अथर्व मुंडे,राहुल किरवे, गजानन मुंडे,मनोज शिंगणापुरे, समर्थ राजमाने, किरण फल्ले,यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले..

Post a Comment

0 Comments