अभय वार्ता वृत्तसेवा/ धाराशिव
जयनारायण दरक
आज दिनांक 17/02/2026 रोजी पोलीस ठाणे शिराढोण हद्दीतील मौजे लोहटा पश्चिम गावातील शेतकरी 1) अशोक ज्ञानोबा अडसूळ यांनी त्यांचे शेती गट नंबर 175 मध्ये 2)नरसिंग अच्युत अडसूळ यांनी त्यांचे शेती गट नंबर 236 मध्ये तसेच 3)निलेश शिवाजी पवार यांनी त्यांचे शेती गट नंबर 227 मध्ये विनापरवाना,बेकायदेशीरपणे ,स्वतःचे फायद्याकरीता अफू या अमली पदार्थ असलेल्या झाडाची /पिकाची लागवड करून जोपासना करताना मिळून आले.त्यांचे शेतामध्ये त्यांनी अनुक्रमे 18.92 किलो, 26.73 किलो, 4.460किलो, असे एकूण 47.11 किलो वजनाचे पीक अंदाजे किंमत 7,06,650 रुपये त्यांचे शेतामध्ये छापा कारवाई करून जप्त करण्यात आले आहे.
सदर ची कारवाई ही मा.पोलिस अधीक्षक धाराशिव खोकर मॅडम,अप्पर पोलिस अधीक्षक अमना मॅडम,उपविभागीय पोलिस अधिकारी कळंब संजय पवार साहेब यांचे मार्गदर्शनखली API श्री धरणीधर कोळेकर, PSI परमेश्वर पवार ,पो. ह. कबिरदास गायकवाड,परमेश्वर मेंगले पोलिस अंमलदार जाधव, वडणे, मरलापल्ले,शिंदे,देशमाने, मुळे,महिला पोलिस अंमलदार ठोंबरे मॅडम, अचलेरकर, मुळे यांनी केली. तसेच सदर छापा कार्यवाही कमी राजपत्रित अधिकारी म्हणून ए.टी. चिंतले पोलीस निरीक्षक कळंब तसेच N.N.सुतार मंडळ अधिकारी शिराढोण हे हजर होते.
वरील आरोपी हे पोलिस यांनी ताब्यात घेतले असून त्यांचे वर पोलिस स्टेशन शिराढोण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
📍 युवकांना नशेच्या विळख्यातून वाचवण्याचा प्रयत्न
अफू, गांजा आणि इतर अंमली पदार्थांमुळे युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी जात असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अशा पार्श्वभूमीवर टास्क फोर्सकडून होत असलेल्या कारवाया केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून सामाजिक जबाबदारीचेही प्रतीक ठरत आहेत.
शेतीसारख्या पवित्र व्यवसायाचा वापर जर अंमली पदार्थांच्या लागवडीसाठी होत असेल, तर ते केवळ कायद्याचा भंग नसून समाजाच्या भविष्यावर आघात आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारची लागवड होणे ही चिंतेची बाब असून, प्रशासनाने सतर्कतेची पातळी अधिक वाढवण्याची गरज आहे.
---------------------------------------------------------------------

.jpg)
Post a Comment
0 Comments