Type Here to Get Search Results !

धाराशिवमध्ये अफू लागवडीचा पर्दाफाश..! १२ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

धाराशिवमध्ये अफू लागवडीचा पर्दाफाश..! 

 १२ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त



अभय वार्ता वृत्तसेवा/ धाराशिव



 धाराशिव जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील लढ्याला आणखी बळ देणारी मोठी कारवाई समोर आली आहे. मौजे खेड (ता. जि. धाराशिव) येथील शेतजमिनीत अफूच्या झाडांची अवैध लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, छत्रपती संभाजीनगर कृती विभागाने ८३ किलो अफूची झाडे जप्त केली आहेत. जप्त मालाची अंदाजित किंमत १२ लाख ३३ हजार ४५० रुपये इतकी आहे.


 गोपनीय माहितीवरून छापा


दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे टास्क फोर्सने गट क्रमांक १४१, १४२, १५३ व १७४ मधील शेतांवर छापा टाकला. संबंधित शेतजमिनीत अफूची लागवड करून तिची देखभाल आणि रखवाली केली जात असल्याचे निष्पन्न झाले. पंचनामा करून फुलांसह व बोंड्यासह सर्व झाडे उपटून जप्त करण्यात आली.


या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा १९८५ कलम ८(क) व १८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित शेतकरी लिवराज पांडुरंग लोमटे, रामहारी नामदेव लोमटे, नरहरी गोविंद लोमटे व ज्ञानेश्वर वसुदेव टकले (रा. खेड) यांची नावे समोर आली आहेत.

Post a Comment

0 Comments