Type Here to Get Search Results !

मतदानदिवशी सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळंब तालुक्यात अवैध दारूवर कारवाई 

मतदानदिवशी सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळंब तालुक्यात अवैध दारूवर कारवाई 






अभय वार्ता वृत्तसेवा /कळंब 


जयनारायण दरक 


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक २०२५ चे अनुषंगाने निवडणुक आदर्श आचार सहिंतेच्या काळात दि.०२ डिसेंबर २०२५ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक जि.धाराशिव विभागाने विभागाचे मा. श्री.डॉ.राजेश देशमुख,आयुक्त,मा.श्री. प्रसाद सुर्वे सहआयुक्त, (दक्षता व अंमलबजावणी) राज्य उत्पादन शुल्क,श्रीमती संगीता दरेकर, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, छ. संभाजीनगर विभाग छ. संभाजीनगर, श्री.हर्षवर्धन शिंदे,अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जि. धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली मौजे.माळकरंजा, मौजे.वाठवडा ता.कळंब येथे हातभट्टी निर्मिती रसायन जप्त करून ०३ गुन्हे नोंद केले करून ०३ आरोपी नामे १) बादल उमराव चव्हाण रा.माळकरंजा ता.कळंब २) खय्युम शब्बीर बेग रा.वाठवडा ३) सोनाबाई शिवाजी काळे रा.वाठवडा ता.कळंब तसेच वरूडा शिवार परिसर ता.जि.धाराशिव येथे ०१ गुन्हा नोंद करून ०१ आरोपी नामे १)रमेश दादाराव गाढवे रा.वरुडा ता.जि.धाराशिव सदर कारवाई एकुण रु १,०३,९६०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



     सदर ची कारवाई श्री.हर्षवर्धन शिंदे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जि.धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण ढोकरे, प्र.निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जि. धाराशिव, सोबत आर.के बागवान दु.नि, ए.ए. गवंडी, टी.एच. नेर्लेकर, ए.सी.खराडे, ए.डी. गटकांबळे, संतोष कलमले, महिला जवान ऐश्वर्या इंगळे, यांनी सदरची कारवाई यशस्वी केली असुन पुढील तपास बाळकृष्ण ढोकरे, प्र.निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जि.धाराशिव हे करीत आहेत.



       जिल्ह्यातील अवैध मद्य निर्मीती वाहतुक व विक्रीबाबतची माहिती या कार्यालयास कळविणेबाबत अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जि. धाराशिव यांनी जनतेला आवाहन केले आहे.

=======================================




Post a Comment

0 Comments