कळंब नगर परिषद निवडणुकीत मतदानांचा हक्क बजावत असताना श्री.रमेश दादाराव रितापुरे व सौ.दिपांजली रमेश रितापुरे.
-------------------------------------------------------------------------
एक नगराध्यक्ष पदासह 20 नगरसेवकांचे भवितव्य मतपेटीत बंद ,तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी .उमेदवारांचा जीव टांगणीला तर प्रशासनांचा मत पेटीवर डोळ्यात तेल घालून पहारा!
अभय वार्ता वृत्तसेवा /कळंब
जयनारायण दरक
कळंब नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया नियोजनबध्द पार पडली !
कळंब नगर परिषदेच्या २० जागांसाठी दहा प्रभागात २४ मतदान केंद्रांवर २० हजार ९५८ मतदार पैकी १५ हजार २३४ दहा प्रभागांमधील मतदानासाठी २४ कंट्रोल व बॅलेट युनिटच्या ४४ यंत्र मतदान केंद्रांवर उत्साहात मतदान झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हेमंत ढोकले, सहायक अधिकारी तथा पालिकेचे मुख्याधिकारी मंजूषा गुरमे यांच्या नियंत्रणाखाली निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. पालिकेच्या १ नगराध्यक्षासह १० प्रभागांतील २० जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. निवडणूक रिंगणात नगराध्यक्षासाठी ६, तर नगरसेवक पदासाठी ६७ उमेवार आहेत. एकूण २० हजार ९५८ मतदाना पैकी १५ हजार २३४ मतदारांनी हक्क बजावला.
यात ७ हजार. २३१ महिला व ८००३ पुरुष मतदारांनी मतदान केले. पालिकेचे दहा प्रभाग आहेत. एक ते दहा प्रभागातून प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून येणार आहेत, या साठी १३२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.
प्रत्यक्षात मतदानासाठी कन्ट्रोल युनिट २४, बॅलेट युनिट ४४ आणीबाणी - प्रसंगी अतिरिक्त स्वरुपात १० मतदान यंत्रे तयार ठेवण्यात आली होती.
९६ मतदान अधिकारी केंद्रावरील मतदाराची ओळख पटविणेसाठी १२ महिला कर्मचारी व २४ शिपाई असा एकुण १३२ प्रत्यक्ष मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होती.
तगडा पोलीस बंदोबस्त
कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने १ उपविभागीय पोलीस अधिकारी, १ पोलिस निरीक्षक, २ सहायक पोलीस निरीक्षक, ६ पोलीस उपनिरीक्षक, ६८ पोलीस अंमलदार व ६५ होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात केला होता.
========================================
.jpg)
Post a Comment
0 Comments