विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त संत ज्ञानेश्वर मुकबधिर विद्यालयातील मुलांना स्वादिष्ट भोजन तसेच उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप
अभय वार्ता वृत्तसेवा/ कळंब
जयनारायण दरक
पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त
संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय, कळंब येथील मूकबधिर विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी मूकबधिर शाळेतील विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला,
या कार्यक्रमाचे आयोजन पर्याय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले होते, विलास गोडगे, भिकाजी जाधव, विकास कुदळे, बालाजी शेंडगे यांनी विश्वनाथ अण्णा तोडकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगाव चे सचिव शहाजी चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधवर, विशेष शिक्षक अश्रुबा कोठावळे, विशेष शिक्षिका सुनिता गुंड, सुनंदा गायकवाड, तसेच शिक्षक गणेश फरताडे उपस्थित होते.
विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पोषक व स्वादिष्ट भोजन देण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शालेय वातावरण अधिक आनंददायी बनते, असे सांगितले.
========================================
विश्वकर्मा
फर्निचर & इंटरियर
मंगरूळ ता. कळंब जि. धाराशिव
लाकडी चौकटी, दरवाजे व इतर सर्व कामे केले जातील.
कुमार बळीराम पांचाळ
=========================================

.jpg)
.jpg)
Post a Comment
0 Comments