हजारो भाविकांनी घेतले खंडोबाचे दर्शन
अभय वार्ता वृत्तसेवा/दहिफळ
जयनारायण दरक
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील खंडोबा देवाची यात्रा उत्साहात पार पडलीसकाळी राजे ग्रुपचा नैवद्य वाजतगाजत खंडोबा देवा दाखविण्यात आला.यंदा राजे ग्रुपने तीन लाखाचा महाप्रसाद वाटण्याचे आयोजन केले होते.नागदिव्याच्या रात्री महाप्रसाद तयार करण्यासाठी सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.सकाळी १० वाजल्यापासुन महाप्रसादाचे वाटप सुरू झाले.तसेच मानाचा नैवद्य सुतार समाजाचा गावातुन वाजत गाजत आनण्यात आला.मानाचा नैवद्य दाखविल्यानंतर लंगर मिरवणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला.यंदाचे लंगराचे मानकरी श्रीकांत धोंगडे,सज्जन कोठावळे होते.गावातून वाजतगाजत लंगर मिरवणुक झाली.हजारोंच्या उपस्थीतीत लंगर तोडण्यात आले.
एक झटक्यात दोन्ही लंगर तुटले.लंगर तुटताच यळकोट यळकोट घे मल्हारचा गजर घुमला.लंगर तोडल्यानंतर गाडा बगाड मिरवणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला.घंटीचे मानकरी ,बैलजोडीचे मानकरी उत्साहाने गाडाबगाडच्या मिरवणुकीत सहभागी झाले.खंडोबा यात्रेत हजारो भाविक जमले होते.यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.यात्रा शांतेत पार पाडण्यासाठी यात्रा कमीटीने परिश्रम घेतले.येरमाळा पोलिस स्टेशनचे कर्मचारी यावेळी उपस्थीत होते.
यंदाचे यात्रेचे अकर्षण लेझीम पथक ठरले.गावातील ५३ लोकांनी एकत्र येऊन लेझीम पथक तयार केले आहे.
========================================

.jpg)
Post a Comment
0 Comments