Type Here to Get Search Results !

पोलीस दलात शिस्तभंग आणि निष्काळजीपणा बाबत कोणतीही सहनशीलता दाखविली जाणार नाही - पोलीस अधीक्षक रितू खोखर

पोलीस दलात शिस्तभंग आणि निष्काळजीपणा बाबत कोणतीही सहनशीलता दाखविली जाणार नाही - पोलीस अधीक्षक रितू खोखर





अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव


जयनारायण दरक 


जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी जबाबदारी, पारदर्शकता आणि वेळेवर कार्यवाही यांना प्राधान्य दिले जाईल, 


तसेच पोलीस दलात शिस्तभंग आणि निष्काळजीपणा बाबत कोणतीही सहनशीलता दाखविली जाणार नाही. अशा सुचना पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी दिल्या.


पोलीस विभागातील जबाबदारी आणि शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य देत जिल्हा पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी कठोर कारवाई करत तामलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार/१४१३ अलताफ मकबुल गोलंदाज यांना निलंबित केले आहे. दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी नेमून दिलेल्या कर्तव्यात जानूनबुजून कसुरी केल्याचा आरोप त्यांच्या विरोधात असून, संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 


आज दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांना निलंबन आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.

======================================

सौजन्य:

 राधा कृष्ण

 द वर्ल्ड ऑफ प्युअर व्हेज रेस्टॉरंट 

 जंत्रे प्लाझा च्या समोर जिजाऊ चौक ढोकी रोड कळंब,

 अमित माळी, 9527197374


======================================



Post a Comment

0 Comments