प्रभाग क्रमांक 8 मध्ये मोहसीन सलीम मिर्झा यांचे पारडे जड — “मिर्झा पॅटर्न” चर्चेत
कळंब
कळंब नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदारांची समीकरणे वेगाने बदलत आहेत. एकूण 2,491 मतदार असलेल्या या प्रभागात मुस्लिम मतदार 938, दलित 750, मराठा 220 तर इतर 500 मतदारांची संख्या आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.
या प्रभागातून मोहसीन सलीम मिर्झा सर्वसाधारण पुरुष या गटातून रिंगणात असून त्यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यांचं काम सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि युवकांमध्ये असणारी त्यांची लोकप्रियता मिळवली आहे त्यामुळे यापूर्वी अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल केलेले इमरान सय्यद यांनी अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता त्यामुळे मोहसीन मिर्झा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली असून मिर्झा यांचा पारडा जड झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
प्रभागात वनमाला शंकर वाघमारे मुस्ताक कुरेशी, राजेश्वरी टोपे तसेच शशिकांत निरफळ रेखा कसबे लक्ष्मण कापसे , प्रीती हौसलमल असे उमेदवार रिंगणात असले तरी मिर्झा यांना मिळालेला पाठिंबा ही निवडणुकीतील महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे.
इमरान सय्यद हे या भागातील प्रभावी आणि जनतेसाठी सहज उपलब्ध होणार व्यक्तिमत्त्व असून त्यांचा पाठींबा मिळाल्याने मोहसीन मिर्झा यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे मतदारांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता प्रभाग क्रमांक 8 मध्ये “मिर्झा पॅटर्न” जोरात चालू असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Post a Comment
0 Comments