अभय वार्ता वृत्तसेवा / वाशी
जयनारायण दरक
मौजे .सारोळा मांडवा कळंब पारा रस्ता मागील महिन्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे सोरोळा मांडव्या जवळील गट.नं.334 पुलाजवळील रस्ता पूर्ण खरडून गेला होता. सदरील रस्त्यावर रोज हजारो वाहने व विद्यार्थी पाई ये जा करत होते. परंतु सदरील पुलावरील मुरूम वाहून गेल्यामुळे खूप मोठा खड्डा पडला होता अक्षरशा जीव मुठीत घेऊन प्रवाशांना वाहने चालवावी लागत होती तर काही लोक रात्री त्या रस्त्यावर अपघातास बळी पडत होते.
ही बाब ग्राम महसूल अधिकाऱ्यांला जाता येताना लक्षात आल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी डि.व्ही .सिरसेवाड पाटील यांनी गावातील काही शेतकऱ्यांच्या मदतीने मुरूम टाकून रस्ता तात्पुरता दुरुस्त केला. त्यासाठी गावातील नागरिकांचे सहकार्य मिळाले दिगंबर मोरे गावातील सरपंच डोईफोडे तसेच काही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सदरील रस्त्यावर लोकांच्या मदतीने मुरूम टाकला आणि त्यामुळे थोडा का होईना प्रवाशांना व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.
========================================

Post a Comment
0 Comments