भारतीय संविधान दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा येथे विविध उपक्रमाने उत्साहात साजरा.
अभय वार्ता वृत्तसेवा /कळंब
कळंब .तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा येथे संविधान दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यातआले.प्रसिद्ध शिवव्याख्याते श्री. महादेव खराटे यांनी भारताचे संविधान या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला असे गौरवोद्गार महादेव खराटे यांनी काढले.
विद्यार्थी भाषणे, तसेच 26 /11 रोजी शहीद झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील भारत मातेच्या सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धा घेऊन विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने वही पेन व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना एक पोते भरून संत्री/ मोसंबी चे वाटप करण्यात आले. उपक्रमशील शिक्षक श्री तुकाराम कराळे यांचनी संविधान दिनाचे सुंदर असे फलक लेखन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहशिक्षिका शिवनंदा स्वामी व आभार प्रदर्शन तुकाराम कराळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक बलभीम राऊत व स्वयंसेवक बापू हजारे यांनी परिश्रम घेतले.
=======================================
सौजन्य ;
विश्वकर्मा
फर्निचर & इंटरियर
मंगरूळ ता. कळंब जि. धाराशिव
लाकडी चौकटी, दरवाजे व इतर सर्व कामे केले जातील.
कुमार बळीराम पांचाळ
9763624741
965720 8227
===================

.jpg)
Post a Comment
0 Comments