अभय वार्ता वृत्तसेवा /रांजणी
जयनारायण दरक
रांजणी (ता. कळंब): संविधान दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव आणि साई संगणक शास्त्र महाविद्यालय रांजणी यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्व विकास व मुलाखत तंत्र या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेडचे असिस्टंट जनरल मॅनेजर समीर सय्यद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले . संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले.तसेच 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सय्यद म्हणाले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी संवाद कौशल्य, तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वास अत्यावश्यक आहे. मुलाखतीपूर्वी योग्य आणि परिपूर्ण तयारी केल्यास विद्यार्थ्यांसाठी जगभरात संधींची दारे खुली होतात. जगातील अनेक कंपन्यांना सक्षम आणि आत्मविश्वासू उमेदवारांची गरज आहे.” विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासासोबत मुलाखत तंत्राचीही तयारी करावी, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जे. सी. गवळी यांनी भूषविले. जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे रोहित सुरवसे, विद्या नाडे, सिमरन शिंदे, लक्ष्मण पवार नॅचरल शुगरचे कामगार कल्याण अधिकारी एम. डब्ल्यू. नाईकनवरे आदी कार्यक्रमास उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. ए. डी. जाधव यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एन. एम. चाऊस, प्रा. एम. के. साबळे, प्रा. पी. जी. मोरे, एम. आय. शिंदे, डी. एल. शेळके, बी. डी. लांडगे, एस. एच. शेख आदींनी परिश्रम घेतले.
बीसीए व बीसीएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
======================================
सौजन्य:
राधा कृष्ण
द वर्ल्ड ऑफ प्युअर व्हेज रेस्टॉरंट
जंत्रे प्लाझा च्या समोर जिजाऊ चौक ढोकी रोड कळंब,
अमित माळी, 9527197374
=========================================



Post a Comment
0 Comments