Type Here to Get Search Results !

धाराशिव हादरले! रुई (ढोकी) रेल्वे फाटकाजवळ तरुणीचा जाळून खून; मृतदेहाचा झाला कोळसा

धाराशिव हादरले! रुई (ढोकी) रेल्वे फाटकाजवळ तरुणीचा जाळून खून; मृतदेहाचा झाला कोळसा




अभय वार्ता वृत्तसेवा ​/ धाराशिव


जयनारायण दरक 


धाराशिव तालुक्यातील रुई (ढोकी) शिवारात असलेल्या रेल्वे फाटकाजवळ एका अज्ञात तरुणीचा जाळून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 


आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह इतका भयानक जाळला आहे की, मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मृत तरुणीची ओळख पटवणे मोठे आव्हान आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार, आज (काल) सकाळी काही नागरिक रेल्वे फाटकाजवळून जात असताना त्यांना एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. 


घटनास्थळाचे दृश्य अत्यंत विदारक होते. मृतदेह पूर्णपणे जळालेले असल्याने तिच्या वयाचा, कपड्यांचा किंवा शरीरावरील ओळखीच्या खुणांचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे. नागरिकांनी तात्काळ ढोकी पोलिसांना याची माहिती दिली.



मृतदेह ओळखायचा तरी कसा', रेल्वे फाटकाजवळ तरुणीचा जाळून कोळसा; धाराशिवमध्ये भयानक जळीतकांड


जाळण्यापूर्वी तरुणीचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज


पोलीस कारवाई :  ढोकी पोलीस आणि एपीआय हजारे घटनास्थळी दाखल.


या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

========================================




Post a Comment

0 Comments