रांजणी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा.
अभय वार्ता वृत्तसेवा/रांजणी
ताहेर पटेल
कळंब तालुक्यातील रांजणी येथे जि. प. प्रशाला मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रगीताने करण्यात आली व सावित्रीबाई फुले आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजनकरुन . सरपंच राजाभाऊ आगरकर, उपसरपंच अन्सार शेख, शालेय समिती अध्यक्ष इलाही शेख, सोसायटी चेअरमन प्रल्हाद गोरे, व्हाईस चेअरमन, वाहेद शेख, तंटामुक्ती अध्यक्ष मतीन पटेल, ग्रामपंचायत सदस्य, अलीम भाई शेख, शिक्षक फिरोज पठाण, गायकवाड सर, अलिप सय्यद, चौधरी हनुमंत, सय्यद खुदुस यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
ही शाळा स्थापना सन 19 39 इसवी सन मध्ये स्थापन झाली या शाळेमध्ये. कृषिरत्न बीबी ठोंबरे सारखे अनेक उद्योजक, डॉक्टर, शिक्षक, अभियंता, प्राध्यापक, व्यापारी, आदर्श शेतकरी या शाळेत आजपर्यंत तयार झाले.
आणि या कार्यक्रमाला परिसरातील पूर्ण माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना एकमेकांना उजाळा देत आनंद व्यक्त केला. तसेच यामध्ये शाळेला देणगी म्हणून, आलिफबापूजी सय्यद. यांनी त्यांचे आई-वडील यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी शाळेला दहा हजार रुपये देणगी स्वरूपामध्ये देण्याची आश्वासन दिली. हनुमंत चौधरी यांनी टीव्ही सेट व संविधान भेट दिले देण्याचे आश्वासन दिले, मदन मनोहर बनसोडे यांनी. कॉम्प्युटर सेट देण्याची आश्वासन दिले.
फिरोज खान पठाण यांनी पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. अनेक विद्यार्थ्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आणि पुढील काळामध्ये ही शाळा जिल्ह्यामध्ये नामांकन मिळवून देण्याचे आश्वासन येथील शिक्षक यांनी आश्वासन दिले, त्यामध्ये मेळावा यशस्वी करण्यासाठी. मुख्याध्यापक विजयकुमार गुरव, रामहरी कांबळे, श्रीनिवास पवार, एजाज अलीशेख, साळुंखे उमेश,रमा पाईक, इंदू मतीगंगणे, ज्योती चित्ते, बुशरा शेख, व शालेय समिती व्यवस्थापन यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला या कार्यक्रमाचा निरोप समारंभ कांबळे सर यांनी केला.
=======================================


Post a Comment
0 Comments