Type Here to Get Search Results !

फुले विद्यालयात पालक मेळाव्यास प्रतिसाद

फुले विद्यालयात पालक मेळाव्यास प्रतिसाद





अभय वार्ता वृत्तसेवा/ कळंब



कळंब-शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालयात शिक्षक विद्यार्थी पालक मेळावा संपन्न झाला. सदरील पालक मेळावा इयत्ता ९वी व १० वी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे हे होते. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी शिंदे भवर, उपमुख्याध्यापक सोमनाथ सावंत, पर्यवेक्षक शंकर गोंदकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पालक प्रतिनिधी म्हणून पत्रकार अमर चोंदे, रफिक रंगरेज, वैशाली पटेकर उपस्थित होते. 


यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना येणाऱ्या समस्या सांगितल्या त्यावर प्रशासन कोणत्या प्रकारे उपाययोजना करणार याबद्दल प्रशासनाने आपली भूमिका सांगितली. उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ मीनाक्षी शिंदे भवर, सहशिक्षक कमलाकर गिरी , प्रतिभा गांगुर्डे यांनी आपले विचार मांडले. त्याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शंकर गोंदकर यांनी केले तर सूत्रसंचालन परमेश्वर मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर तोडकर यांनी मानले यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

===============================

सौजन्य:

 राधा कृष्ण

 द वर्ल्ड ऑफ प्युअर व्हेज रेस्टॉरंट 

 जंत्रे प्लाझा च्या समोर जिजाऊ चौक ढोकी रोड कळंब,

 अमित माळी, 9527197374


=======================================





Post a Comment

0 Comments