Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा येथे बालदिन विविध उपक्रमांनी साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा येथे बालदिन विविध उपक्रमांनी साजरा




अभय वार्ता वृत्तसेवा/ कळंब 


जयनारायण दरक 

जि. प. प्रा .शाळा आढाळा येथे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती अर्थात बालदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जयंतीच्या निमित्त पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड व उपक्रमशील शिक्षक तथा प्रसिद्ध शिवव्याख्याते महादेव खराटे यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.


तसेच जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला भेट देण्यात आलेली विविध महापुरुषांची चरित्रे व ग्रंथालयातील पुस्तके यांचं वाचन घेण्यात आले. तसेच बाल दिनानिमित्त इयत्ता सहावीच्या वर्गाच्या बाल सभेचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले.


शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना बाल दिनानिमित्त खाऊचे वाटप करण्यात आले.त्याचबरोबर बाल दिनानिमित्त पाढे पाठ स्पर्धा व वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली व त्याचे बक्षीस वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले. 


इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना बाल दिनानिमित्त स्कॉलर या शिष्यवृत्तीच्या प्रश्नपत्रिका संच मोफत वाटप मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या वतीने करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा यांनी विविध उपक्रम राबवून आज पंडित नेहरू यांची जयंती शाळेत साजरी केली, त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी सहशिक्षक तुकाराम कराळे स्वयंसेवक बापू हजारे यांनी परिश्रम घेतले.

=====================================

सौजन्य;

 गायत्री फर्निचर कळंब

ऋषिकेश पांचाळ ,

8999547491

राजाभाऊ पांचाळ

9657771242




Post a Comment

0 Comments