मंगरूळ येथे पुरात वाहून गेलेला पुल व रस्ता स्वखर्चातून केला पूर्ण!
विद्यार्थी व शेतकरी यांच्या चेहऱ्यावर त्यामुळे उमटले समाधान.
अभय वार्ता वृत्तसेवा / मंगरूळ
जयनारायण दरक
कळंब तालुक्यातील मंगरूळ ( जुन्या पाठीवरील रस्त्यावरील पूल) गावातील तसेच परिसरातील एकूण ४ गावांना (भाटशिरपुरा, बोरवंटी, जवळा, कोथळा) या चार गावांना जोडणारा कच्चा पुल काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे आलेल्या पुरात पूर्णतः वाहून गेला आहे (१२३.८ मिलिमीटर). त्यामुळे नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास, रुग्णांना दवाखान्यात पोहोचवण्यासाठी, शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी अत्यंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. गावातील नागरिक शेतकरी आपला जीव धोक्यात घालून चालू पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढून येणे जाणे करत आहेत. त्यामुळे गावाचा संपर्क तुटण्याचे आणि जीवाला धोका होण्याचे मोठे संकट आहे.
तरी प्रशासनाने , गावांना जोडणाऱ्या या पुलाचे नवीन बांधकाम तातडीने मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध करावा व कामाला तत्काळ प्रारंभ करावा. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .
तसेच पुलाच्या मजबुतीकरणासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात, जेणेकरून भविष्यात अशा परिस्थितीला गावांना पुन्हा तोंड द्यावे लागू नये.
मंगरूळ येथील शेतकऱ्यांनी आपली दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी चार गावांना जोडणारा केवळ एकच नदीवरील मार्ग हा आपल्या वैयक्तिक स्वखर्चातून कच्चा पूल बांधलेला आहे. अनेक वर्षे सरकारी स्तरावर पुलाच्या मंजुरीसाठी प्रयत्न होत असूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी संघटनबद्ध होऊन हा कच्चा पूल पूर्ण केला आहे. परंतु, सद्यस्थितीत हा पूल तात्पुरता व अपुर्या सुविधा असलेला असून भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. दैनंदिन वाहतूक, विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांचे आरोग्य, शेतकऱ्यांना दैनंदिन कामकाजाबाबत सर्व बाबींमध्ये अडथळे निर्माण होतात.
सदर शेतकरी आणि ग्रामस्थांना सुरक्षित व कायमस्वरुपी पुलासाठी त्वरित शासनस्तरावर मंजुरी द्यावी, तसेच ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी त्वरित निधी व प्रशासकीय मान्यता द्यावी, ही नम्र विनंती आहे.
अभिजीत झाडके
या रस्त्याने शेतकरी तर येतातच पण विद्यार्थ्यांना पण शाळेत ये-जा या रस्तेने या पुलावरून करावा लागत
बऱ्याच वर्षापासून येथील शेतकऱ्यांची मागणी होती.
तात्पुरती सोय झालेली आहे. पण यामध्ये प्रशासनाने लक्ष घालून कायमस्वरूपी पूल करून द्यावा अशी येथील शेतकऱ्याची मागणी होत आहे.
मधुकर रितापुरे
माझे वय 33 आहे माझ्या बापाचे वय 65 आहे माझ्या आज्याचे वय 80 होते तेव्हापासून ते संघर्ष करत होते रस्त्यासाठी पहिल्यांदा रस्त्याला हा शेतकरी येऊ देत नव्हता तो शेतकरी येऊ देत नव्हता कसातरी रस्ता झाला पुन्हा नदीचा प्रश्न तसाच राहिला नदीला पाणी आलं की सहा महिने पाटीकडच्या रस्त्याने जायचे शाळेत तिकडूनच जायचे आता आमचं दुःख आम्ही समस्त शेतकऱ्यांनी मिळवून तात्पुरता रस्ता पूल तयार केला आहे. पण यामध्ये प्रशासनाने लक्ष घालून कायमस्वरूपी पूल करून द्यावा अशी आमची मागणी आहे.
हनुमंत सर्जेराव भोसले
विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नव्हतं म्हणून आम्ही आमचे माणस सहकार्याला होते. सहकार्याची नावे - नारायण भराडे ,प्रमोद बोंदरे, माणिक भराडे ,त्रिंबक बोंदर, सुधाकर रितापुरे,हनुमंत भोसले, मधुकर जगताप, बालाजी काळे या सर्वांनी स्वखर्चाने रोड करून घेतला आहे.
बालाजी काळे
========================================
सौजन्य:
राधा कृष्ण
द वर्ल्ड ऑफ प्युअर व्हेज रेस्टॉरंट
जंत्रे प्लाझा च्या समोर जिजाऊ चौक ढोकी रोड कळंब,
अमित माळी, 9527197374
=======================================

.jpg)

Post a Comment
0 Comments