अभय वार्ता वृत्तसेवा /वाशी
जयनारायण दरक
धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून नुकतीच शंकरराव शिंदे यांची नियुक्ती झाली असून, त्यांच्या नियुक्तीनंतर तालुक्यातील विविध संघटनांकडून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. नुकताच पोलीस निरीक्षक संग्राम थोरात यांची बदली धाराशिव पोलीस मुख्यालयात झाल्याने त्यांच्या जागी बीड येथून आलेले शंकर शिंदे यांनी कार्यभार स्वीकारला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाशी तालुक्यातील पोलीस पाटील संघटना, सरपंच संघटना आणि पत्रकार संघटनेतर्फे शंकर शिंदे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता वाशी पोलीस ठाण्यात पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी पत्रकार व पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्यात तालुक्यातील पवनचक्की प्रकल्पांशी संबंधित तक्रारी, तसेच सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहन लुटमारीच्या घटनांवर चर्चा झाली. यावेळी शिंदे यांनी सांगितले की, "वाशी तालुक्याच्या हद्दीत वाहन लुटमारीच्या घटना घडू नयेत यासाठी आम्ही आणि आमचे कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करू. तेरखेडा ते पारगाव आणि पार्टीफाटा या परिसरातही सुरक्षेच्या दृष्टीने विशेष लक्ष दिले जाईल. तसेच पवनचक्की प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या अडचणींची दखल घेऊन योग्य तो मार्ग काढला जाईल," असे आश्वासन त्यांनी दिले.
या वेळी दै. लोकमत चे मुंकूद चेडे, दै.पुण्य नगरीचे -गौतम चेडे, दै.दिव्य मराठीचे नवनाथ टकले, दै सकाळ चे नेताजी नलवडे, दै पुढारी चे - दादासाहेब लगाडे, दै .समय सारथी चे -शोएब काझी, दै जनमत चे -राहूल शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
======================================


Post a Comment
0 Comments