अभय वार्ता वृत्तसेवा /कळंब
जयनारायण दरक
नगरपालिका निवडणूक 2025 – मोठ्या राजकीय हालचालींना वेग!
कळंब नगरपरिषद निवडणुकीसाठी (काल) नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने, प्रचंड उत्साहात अर्ज दाखल झाले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 10 अर्ज दाखल!
नगरसेवक पदासाठी तब्बल 129 उमेदवारांच्या अर्जांची नोंद!
कळंब शहरातील राजकीय वातावरण तापले असून, सर्व पक्षांचे दिग्गज नेते आणि कार्यकर्ते आपल्या उमेदवारांसोबत मोठ्या उत्साहात दाखल झालेले दिसले.
आगामी काही दिवसांत छाननी, अर्ज मागे घेणे आणि अंतिम यादी जाहीर होणार असून, कळंबकरांचे लक्ष आता निवडणूक रणधुमाळीकडे!
कळंब नगरपालिका – बदलाची चाहूल की पुन्हा एकदा जुन्या नेतृत्वावर विश्वास?
याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळणार
=====================================
.jpg)

Post a Comment
0 Comments