Type Here to Get Search Results !

“नळदुर्गची दिशा नागरी पतसंस्था लुटणारे आरोपी ४८ तासात जेरबंद. आरोपीकडून १ किलो ४९२ ग्रॅम ७०० मिली वजनाचे दागिने स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी केले जप्त".

नळदुर्गची दिशा नागरी पतसंस्था लुटणारे आरोपी ४८ तासात जेरबंद. आरोपीकडून १ किलो ४९२ ग्रॅम ७०० मिली वजनाचे दागिने स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी केले जप्त".





अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव


जयनारायण दरक 



दि ०८.११.२०२५ रोजी नळदुर्गच्या दिशा नागरी पंतसंस्थेमधील कर्जदारांचे तारण ठेवलेले ४ किलो ७६३ ग्रॅम सोने व २,२१,००० रू रोख रक्कम असा एकूण ०२, ६३,६३,२७२ रूपयांचा मुददेमाल चोरीस गेला होता. सदरबाबत पोस्टे नळदुर्ग गुरनं ३९८ / २५ क ३१६ (५), ३३१ (४), ३०५, ६१ (२), ३ (५) भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार यांचेकडे देण्यात आला होता. नमुद गुन्हयाचे तपासात तांत्रिक विश्लेषणातून बँकेत कामास असणारा लिपीक नामें राहूल राजेंद्र जाधव, रा नळदुर्ग याने त्याचे साथीदारांचे मदतीने सदर चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे केलेल्या चौकशीतून त्याचे साथीदारांची नावे समोर आली. तसेच चोरीस गेलेला मुददेमालही त्यांचेकडेच असल्याची माहिती प्राप्त झाली.

पोनि इज्जपवार यांनी तात्काळ सपोनि कासारव पथक यांना अटक आरोपीच्या साथीदारांचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले. तपासात निष्पन्न झालेले आरोपी हे अत्यंत अटटल, निर्ढावलेले आरोपी असून त्यांचेवर यापुर्वी दरोडा, जबरी चोरीसारखे तसेच शरीराविषयीचे अत्यंत गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले. तसेच त्यांचा सध्याचा काही ठावठिकाणा नसतानाही केवळ तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ०३ आरोपींना पुण्यातून वेगवेगळया ठिकाणांवरून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे केलेल्या चौकशीतून नमुद आरोपींनी चोरी केलेल्या मुददेमालापैकी काही मुददेमाल शेतातील विहीरीत लपवून ठेवला असल्याचे सांगितले. नमुद ठिकाणी जावून शोध घेतला असता एकूण १ किलो ४९२ ग्रॅम ७०० मिली वजनाचे ०१,००,७५,७२५ रूपये किमतीचे दागिने मिळून आल्याने पंचनामा करून जप्त करण्यात आले आहेत. अदयापपर्यंत नमुद गुन्हयात १. राहुल राजेंद्र जाधव, २. सुशिल संजय राठोड, दोघे रा नळदुर्ग ३. संजय अमृत जाधव, रा लाडवंतीवाडी, कर्नाटक, ४. शिलरत्न महादेव गायकवाड, रा औराद ता उमरगा या ०४ आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत असून त्यांचेकडे अन्य साथीदार व मुददेमालाबाबत तपास सुरू आहे. पोलीस अधिक्षक श्रीमती रितू खोखर यांनी सदर गुन्हयाचे पार्श्वभुमीवर जिल्हयातील सर्व सहकारी पतसंस्थांना त्यांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.



सदरची कामगिरी मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक धाराशिव व मा. श्री निलेश देशमुख, पोलीस उपअधिक्षक तुळजापूर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, सपोनि नंदकिशोर सोळंके, पोउपनि ईश्वर नांगरे, पोह दत्तात्रय राठोड, पोह शौकत पठाण, पोह जावेद काझी, पोह फरहान पठाण, पोह दयानंद गादेकर, पोह बळीराम शिंदे, पोना अशोक ढगारे, योगेश कोळी, चापोह सुभाष चौरे, रत्नदिप डोंगरे, नागनाथ गुरव, प्रकाश बोईनवाड यांचे पथकाने केली आहे.

======================================



Post a Comment

0 Comments