शिराढोण येथे सुरक्षिततेसाठी पोलीस -व्यापाऱ्यांची बैठक
अभय वार्ता वृत्तसेवा /शिराढोण
जयनारायण दरक
कळंब तालुक्यातील शिराढोण येथे पोलिस स्टेशन कडून व्यापारी मित्रांची बैठक घेण्यात आली.बैठकीत व्यापारी वर्गाशी संवाद साधण्यात आला.सर्वांना चोरी,फसवणूक,घरफोडी,भुरट्या चोऱ्या बाबत सतर्क केले.स्वतःहून काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले.सीसीटीव्ही चे महत्व सांगून सर्वांना एक कॅमेरा नागरिकांसाठी
लावण्याचे आवाहन केले. रात्रगस्त पेट्रोलिंग ची गस्त बाबत चर्चा करून व्यापारी वर्गाचे सूचना व अडचणी ऐकून घेतल्या. काही संशयित व्यक्ती,हालचाली माहिती वगेरे असल्यास तत्काळ पोलिस ठाणे येथे कळविण्याचे आवाहन केले.
सर्वांनी पोलिस प्रशासन चे सुचणे प्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम लवकर करू असे कळवले.
प्रतिक्रिया :
१) सर्व व्यापारी मित्र यांना आप आपले दुकान मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले आहे.त्यामध्ये एक कॅमेरा हा नागरिकांचे सुरक्षेसाठी बसवावा.जेणेकरून मुख्य रस्ता व गल्ली बोलतील छोटे रस्ते यावर निगराणी राहू शकेल व त्यामुळे शहरातील चोरी, व इतर गोष्टीना आळा बसेल. - धरणीधर कोळेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक, शिराढोण
२) पोलिस स्टेशन मध्ये व्यापारी व पोलिस बैठक ही फार महत्वाची आहे.कारण यात प्रत्येक व्यापारी त्याला येणाऱ्या प्रत्येक अडचणी बद्दल मनमोकळे करता येते .अशी बैठक महिन्यात एकदा व्हावी.जेणे करून चोरीच्या घटनेवर ही अंकुश लावता येईल - विष्णू काळे,व्यापारी संघटना अध्यक्ष, शिराढोण
एक कॅमेरा नागरिकांसाठी ची मोहीम: व्यापारी बैठकीत गावातील बऱ्याच हे निदर्शनास आणून दिले की बऱ्याच व्यापाऱ्यांकडे आपल्या दुकानात सी सी टी व्हि कॅमेरा बसवण्यात आलेले नाहीत तर ते लवकरात लवकर बसवून घ्यावे जेणेकरून गावातील नागरिकांसाठी याचा उपयोग होऊन चोरीच्या घटनेवर आळा बसेल.त्या वेळी व्यापाऱ्यांनी काही दिवसात कॅमेरा बसवण्यात येईल असे पोलिस स्टेशनला आश्वस्त केले.
=======================================
सौजन्य:
राधा कृष्ण
द वर्ल्ड ऑफ प्युअर व्हेज रेस्टॉरंट
जंत्रे प्लाझा च्या समोर जिजाऊ चौक ढोकी रोड कळंब,
अमित माळी, 9527197374
======================================


Post a Comment
0 Comments