अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव
तीन सुवर्णपदक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*
दिनांक: 18 व 19/11/2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या विभागस्तरीय आंतरशालेय योगासन स्पर्धेत कळंब तालूक्यातील देवधानोरा येथील चिमुकला चिं. शिवांश शरद बोंदर याने 14 वर्ष वयोगटात सर्वाधिक 3 सुवर्णपदक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. शिवांश शरद बोंदर हा श्री सरस्वती पब्लिक स्कूल, एम.आय. टी. अंबाजोगाई येथे इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे.
शिवांश च्या या यशाबद्दल तालूक्यातील सर्व स्तरातून त्याच कौतुक आणि अभिनंदन होत आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी समस्त गावकरी व धाराशिव योग शिक्षकांच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहेत.
========================================


Post a Comment
0 Comments