शुभेच्छुक: मित्रपरिवार धाराशिव जिल्हा
🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️
=========================================
ई- पिक पाहणी नोंदीमुळे हमीभाव मिळवणे झाले सोपे
अभय वार्ता वृत्तसेवा /वाशी
जयनारायण दरक
शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली ई पीक पाहणी शेतकऱ्यांना सहजपणे करता यावी या उद्देशाने वाशी तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी डि.व्ही.सिरसेवाड पाटील यांनी खरीप हंगामात सूक्ष्म नियोजन करून गावातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. तसेच गावातील काही स्वयंसेवक तथा महसूल मित्राच्या मदतीनें ज्या शेतकऱ्याकडे मोबाईल नाही किंवा काही शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे ई पीक पाहणी नोंद शिल्लक राहिले होते. त्या सर्व नोंदी स्वतः लक्ष घालून महसूल मित्राच्या व सहाय्यकाच्या मदतीने पूर्ण करून घेतल्या. त्यामुळे आज हाजारो शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाच्या हमी भाव योजनेचा लाभ घेणे सुलभ झाले आहे.
तसेच ई पीक पाहणी पूर्ण झाल्यामुळे पिक कर्ज,ईतर शासकीय योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांनी नेहमी शेतकऱ्यां सोबत असणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
.jpg)
.jpg)
Post a Comment
0 Comments