ग्रामदैवत खंडोबा देवस्थानास वर्गमित्रांनी केली 70 हजारांचे लाईटींग झुंबर अर्पण/मंदिराच्या गाभाऱ्याला आले वेगळेच स्वरूप!अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव
जयनारायण दरक
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामदैवत श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानास वर्गमित्रांनी 7 लाइटिंगचे झुंबर केले अर्पण.याविषयी सविस्तर वृत्त असे की ग्रामदैवत श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान चंपाषष्ठीला (सटीची) मोठी यात्रा असते. परिसरातील सर्वात मोठी व प्रसिद्ध यात्रा म्हणून नावलौकिक आहे.श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानला शासनाचा पर्यटन तीर्थक्षेत्र देवस्थान दर्जा असून दोनशे वर्षेपूर्वीचीही परंपरा असलेली यात्रेला दिवसेंदिवस मोठे स्वरूप येऊ लागली आहे.
यात्रेनिमित्त अनेक भाविक देवस्थानास वेगवेगळ्या वस्तू, साहित्य मंदिरास अर्पण करीत असतात. यावर्षी दहावी बॅच 2014-15 मधील वर्ग मित्रांनी एकत्र येत मंदिरातील गाभार्याची पीवीसी व 7 लाइटिंग चे झुंबर मंदिरास अर्पण केले. यासाठी जवळजवळ 70 हजार रुपये खर्च करण्यात आलेला आहे. यात सज्जन श्रीराम मते, शुभम भातलवंडे , सागर सुतार, अभिषेक मते, अक्षय हावळे रणजीत मते, अजिंक्य भातलवंडे, अभिजीत मगर, शुभम मते, ओंकार हरणे, विलास भातलवंडे, गणेश सुतार, श्रीकांत भातलवंडे, पद्मराज जोगदंड, रविकांत भातलवंडे, सुरज अंगरखे यांचा योगदानात समावेश आहे.
Post a Comment
0 Comments