अभय वार्ता वृत्तसेवा /कळंब
जयनारायण दरक
कळंब तालुक्यातील मौजे शिराढोण पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध मद्यविक्रीवर धडक मोहिम राबवत घारगाव तांडा व जवळा खुर्द परिसरात मोठ्या प्रमाणावर गावठी दारू व साहित्य जप्त केले असून, चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता शिराढोण पोलिसांनी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर यांच्यासह अन्य पोलीस काॅन्सटेबल व त्यांच्या टीमने घारगाव तांड्यातील मीरा रामराव पवार (वय 46) यांच्या घरासमोर छापा टाकून अंदाजे ₹65,000 किंमतीचे 1,000 लिटर गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 250 लिटर तयार गावठी दारू जप्त केली.
त्याच वेळी पोलिसांनी दुसरी कारवाई करत चांगुनाबाई जनक राठोड (वय 44) यांच्या घरासमोरून ₹49,500 किंमतीचे 750 लिटर रासायनिक द्रव व 200 लिटर गावठी दारू जप्त केली. तिसऱ्या कारवाईत विनोद बालू पवार यांच्या घराजवळून ₹74,500 किंमतीचे 1,250 लिटर रासायनिक द्रव व 200 लिटर गावठी दारू हस्तगत करण्यात आली. दरम्यान, दुपारी 2.30 वाजता कळंब–ढोकी रोडवरील जवळी शिवारातील ‘निसर्ग ढाबा’ मागील परिसरात कारवाई करत विशाल बाबुराव शिंदे (वय 28) यांच्या जवळून ₹6,980 किंमतीच्या देशी–विदेशी मद्याच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. अशी माहिती सूत्रांनी दिली.
=======================================
सौजन्य;
*गायत्री फर्निचर कळंब*
ऋषिकेश पांचाळ ,
8999547491
राजाभाऊ पांचाळ
965777124

.jpg)

Post a Comment
0 Comments