अभय वार्ता वृत्तसेवा / कळंब
जयनारायण दरक
कळंब पंचायत समितीत गेल्या काही काळात अनेक बोगस कामांच्या तक्रारींनी तालुक्यात मोठी चर्चा रंगवली होती. सामाजिक कार्यकर्ते आणि तालुक्यातील अनेक नागरिकांनी या गैरप्रकारांविरोधात उपोषण, निदर्शनांच्या माध्यमातून आवाज उठवला होता. या काळात अनेक कर्मचाऱ्यांचे फेरबदल झाले कोणी तोंडी शब्द दिले तर कोणी लेखी आश्वासन दिले असे अनेक रंगतदार चित्र पंचायत समिती कार्यालयात रंगले होते , आणि वेळ मारून घेण्याचं सोग केलं होतं अशातच चक्क रोजगार हमी योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतामध्ये विहीर खोदून पूर्ण बांधकाम केलेले आहे तरी देखील रोजगार सेवकाने फायनल बिल काढण्यासाठी चक्क रेट कार्ड काढून दाखवले आणि पैशाची मागणी केली होती,
अशा पार्श्वभूमीवर आज नव्याने नियुक्त गटविकास अधिकारी श्री. एस. ए. अकेले यांनी पदभार स्वीकारताच पत्रकार, जयनारायण दरक, राजकुमार तूपसौंदरे(नरसिंह कंट्रक्शन बिल्डर डेव्हलपर्स अँड कॉन्टॅक्टर तथा माहिती अधिकार कार्यकर्ता कळंब तालुका संघटक, राष्ट्रीय चर्मकार जिल्हा कार्याध्यक्ष) तसेच तालुक्यातील नेतेमंडळी आणि कार्यालयातील कर्मचारी वर्ग यांनी नवनियुक्त गट विकास अधिकारी यांचे स्वागत केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .
अकेले सरांनी आपल्या कार्यशैलीची चुणूक आणि शिस्तबद्धता कर्मचाऱ्यांना दाखवली आहे. पारदर्शकतेवर भर देत त्यांनी कामकाजात शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्याचे संकेत दिले आहेत.
विशेष म्हणजे, ज्या पंचायत समिती परिसरात कर्मचारी बिनधास्त फिरताना दिसत असत, तेच कर्मचारी आज आपले ओळखपत्र गळ्यात घेऊन शिस्तबद्धपणे कार्यालयीन परिसरात वावरताना दिसले. यामुळे कर्मचारीवर्गात एक नवीन जागरूकता आणि जबाबदारीची भावना निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आता अकेले साहेब तालुक्यातील नागरिकांचा विश्वास कितपत संपादन करतात, तक्रारींवर किती ठोस कारवाई करतात आणि प्रशासनात पारदर्शकता किती वाढवतात, हे पाहण्यासाठी संपूर्ण तालुका उत्सुक आहे.
भ्रष्टाचाराविरोधात आणि अपारदर्शकता दप्तर दिरंगाई दिशाभूल चौकशी,यावरती,ठाम भूमिका घेत कळंब पंचायत समितीत स्वच्छ व पारदर्शक प्रशासनाची नवी दिशा दाखवली जाईल का, हे येणारा काळच सांगेल!
=======================================
सौजन्य:
राधा कृष्ण
द वर्ल्ड ऑफ प्युअर व्हेज रेस्टॉरंट
जंत्रे प्लाझा च्या समोर जिजाऊ चौक ढोकी रोड कळंब,
अमित माळी, 9527197374
=======================================
.jpg)
.jpg)

Post a Comment
0 Comments