अभय वार्ता वृत्तसेवा /कळंब
जयनारायण दरक
कळंब उपविभागात उपविभागीय महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या संजय पाटील यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी अनुभवी व कुशल अधिकारी गणेश शिंदे यांनी कार्यभार स्वीकारल्याची माहिती मिळाली आहे.
महसूल विभागातील विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडणारे शिंदे हे प्रशासनिक कामकाज, आपत्ती व्यवस्थापन, कायदा-सुव्यवस्था राखणे, तसेच नागरिकांना पारदर्शी सेवा देण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे कळंब तालुक्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतीमान व परिणामकारक होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. बदली झालेल्या संजय पाटील यांनी कळंबमध्ये कार्यरत असताना अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली. कृषी, महसूल, आपत्ती व्यवस्थापन, जनकल्याण योजना आदी क्षेत्रांत त्यांनी केलेले काम उल्लेखनीय ठरले.
नवीन उपविभागीय महसूल अधिकारी गणेश शिंदे झाल्याबद्दल "अभय वार्ता" परिवाराकडून विभागीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.तसेच
कळंबसह वाशी तालुक्यातील नागरीकांकडून स्वागत होत.
======================================


Post a Comment
0 Comments