आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गरजू महिलांना उपजीविकेसाठी मोफत ४३ शिलाई मशीनचे वाटप
शेकडो भक्तगणांनी घेतले पादुकाचे दर्शन .
अभय वार्ता वृत्तसेवा /कळंब
विलास मुळीक
जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळा रविवार , दि . ९ नोहेंबर रोजी सकाळी १० वाजता शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या डिकसळ येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर संपन्न झाला असून जिल्ह्यातील हजारो भाविक-भक्तांनी या सोहळ्यास लाभ घेतला .
सकाळी १० वाजता कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून भव्य-दिव्य शोभायात्रेची सुरुवात झाली. या मिरवणुकी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा, राष्ट्रमाता जिजामाता यांचा देखावा, झाशीची राणी देखावा, स्वामी विवेकानंद यांचा देखावा, लेझीम पथक, ढोल पथक, कलशधारी महिला ,निशानधारी महिला पुरुष, भजनी मंडळ , संबळ पथकासह सहभागी झाले होते . जगद्गुरुश्रींचे नामघोष करत रथातुन जगद्गुरुश्रींच्या सिद्धपादुका व प्रतिमेची मिरवणूक सकाळी १० वाजता सुरू झाली होती.
कार्यक्रमाच्या ठिकाणी शोभायात्रा पोहोचल्यावर तेथे प्रथम जगद्गुरूश्रींच्या सिद्ध पादुका पूजन , व त्यानंतर सामाजिक उपक्रम अंतर्गत जिल्ह्यातील निराधार विधवा आर्थिक दुर्बल घटकातील गरजवंत महिलांना सामाजिक उपक्रमात अंतर्गत ४३ महिलांना शिवण यंत्राचे मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर डिकसळ ग्रामपंचायत सरपंच पुष्पाताई धाकतोडे , भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे ,शिवसेनेचे अजित पिंगळे , भाजपाचे तालुकाध्यक्ष अरुण चौधरी, दत्ता साळुंखे, मीनाक्षी भवर ,अनंत वाघमारे, राहुल चव्हाण, विकास कदम ,अनंत बोराडे, संजय अडसूळ, शितल चोंदे ,इमरान मुल्ला, भैय्या खंडागळे ,समीर सय्यद ,संतोष कस्पटे ,सुनील गायकवाड,संजय मुंदडा ,सागर मुंडे या सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . जिल्ह्यातुन जवळपास १५ ते १६ हजार भाविक भक्तांनी या पादुका दर्शन घेतले . सभामंडपात एक हजाराहून अधिक गुरुपूजनासाठी भक्त बसले होते . तर उपासक दीक्षासाठी साधारणतः ६०० भक्तगण सपत्नीकदीक्षा घेण्यासाठी बस ले होते ,यावेळी श्वेता जोशी यांचे यावेळी प्रवचन झाले . त्यानंतर भक्त दिक्षा व पादुका दर्शन सपन्न झाले . सोहळ्याची सांगता पादुकेवरती पुष्पवृष्टी करुण झाली .
कार्यक्रम स्थळी महाप्रसाद व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती . तर या कार्यक्रमासाठी पादुका दौरा प्रमुख समदे आप्पा, मराठवाडा पीठ प्रमुख विजय देशपांडे ,आध्यात्मिक प्रमुख महेश रोमन ,जिल्हानिरिक्षक दत्ता घरत , जिल्हा सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष केसकर,उत्सव समितीचे अध्यक्ष कल्याण बोराडे , कळंब तालुकाध्यक्ष विठ्ठल काटे,बाळासाहेब व्होंडे
, जिल्हा कर्नल शंकर कांबळे , विजय भारती , राजाभाऊ मुळीक , कल्याण बोराडे,जीवन चव्हाण , दिनकर डोंगरे ,बाळासाहेब कानडे, गंगाधर ढवळे, प्रतिक जरंगे ,महेश मुरगे ,प्रवीण खंडागळे, उमाताई गुंठाळ, मीरा माळी, जयश्री ढवळे ,रमेश शिंदे, प्रदीप जाधवर, ज्योती पवार, सहयोग्यता ताई अंधारे , श्रीजीत इंगळे, आकाश जाधव, लक्ष्मी माने , प्रदीप जाधवर , शिवाजी ढवळे, अनंत शेळके,राजेंद्र मुळीक, भारत शेळके, रमेश शिंदे ,स्वप्निल खिंडकर, जीवन चव्हाण, भास्कर जाधव ,पांडुरंग गव्हाणे, शिवाजी सारुक सहआधी नी परिश्रम घेतले तसेच उमरगा, लोहारा ,तुळजापूर ,कळंब, भूम ,परंडा ,वाशी या तालुक्याचे तालुकाध्यक्ष ,जिल्ह्यातील सर्व आरती प्रमुख, सत्संग प्रमुख या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आहे .
जगद्गुरु श्रींच्या कार्याचे कौतुक केले आहे. यामध्ये कोरोना काळामध्ये माणसाजवळ माणूस येत नव्हता पण त्यावेळेस मोफत ॲम्बुलन्सच्या सेवेच्या माध्यमातून समाजसेवेच महान कार्य केलेले आहे. त्यानंतर रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या माध्यमातून महा रक्तदान कुंभ 136747 रक्तदान कुपिका महाराष्ट्र राज्य शासन यांना देऊन महान कार्य केले आहे. ऑक्टोबरच्या एका महिन्यात एक लाखाहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच
तसेच देहदान अवयवदान यामध्ये सुद्धा महान कार्य जगद्गुरु श्रींचा चालू आहे. समाजातील सर्वच घटकांना उपयोगी पडेल असं जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचे कार्य आहे.
-नितीन काळे माजी जिल्हाध्यक्ष भाजपा धाराशिव
यावेळी आन्नदान बनवण्याची मोफत सेवा पाथरीचे चे मुलगीर व त्यांच्या चमूने केली तर कार्य क्रम च्या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित चिंतले , स .पो.नि .पंढरीनाथ मगर , हनुमंत कांबळे, प्रभा पुंडगे, पोलीस उपनिरीक्षक शिराज पठाण आणि त्यांच्या चमूने चोख बदोबस्त ठेवला,यावेळी नपचे मुख्याधिकारी मंजुषा गुरमे व कार्यालयीन अधीक्षक श्री वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखालीअग्नीशामक दल व त्यांचे जवान तैनात होते ,त्याच प्रमाणे उपजिल्हा रूग्णाल्याचे वैद्याकिय अधिक्षकडॉ .नागनाथ धर्माधिकारीयांच्या मार्गदर्शनाखाली १०८ रुग्णवाहिका चे डॉ .नंदकुमार गोरे ,वनपाल गायकवाड व संतोष शेंडगे यांनी कार्यक्रम स्थळी रुग्णवाहीकापाठुन रूग्णाची सेवा केली . या कार्य कार्यक्रमाची सांगता आरती होऊन सर्वंना महाप्रसादाचे वाटप होऊन सांगता करण्यात आली.
========================================



Post a Comment
0 Comments