काही ठिकाणी सोलार प्लेट तर काही ठिकाणी सोलार सिस्टिमचे स्टार्टर देखील चोरी होण्याच्या घटना वाढल्या
अभय वार्ता वृत्तसेवा/ कळंब
जयनारायण दरक
शासकीय योजनेतून कळंब तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बोरवेल्स आणि विहिरीवर सौर पंप बसवले आहेत. मात्र याच सौर पंपाचे पॅनल चोरणारी टोळी सध्या कळंब तालुक्यामध्ये सक्रिय झाली आहे.
तसेच गेल्या काही दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात लावण्यात आलेले सौर पंपाचे पॅनल चोरी झाल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल झाल्या आहेत.
कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील शेतकरी पेजगुडे आणि उमेश कल्याण गायकवाड यांचे मागील दोन महिन्याखालीच या शेतकऱ्यांच्या शेतात बसवलेल्या सर्व पॅनलच्या प्लेटा चोरून नेल्या आहेत तब्बल अंदाजे तीन ते चार लाख रुपये किमतीच्या प्लेटा वायर सह अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत त्याचा तपास लागला नाही तर मागील तीन ते चार दिवसांत मध्यरात्री सुनील सुदाम जगताप,संजय बंकट सावंत, राजेंद्र विश्वंभर मिटकरी आणी पोपट गोरख हाके या शेतकऱ्यांचे वायर चोरीला गेले आहे तर प्रकाश अंकुश कवडे यांचे जैन कंपनीचे स्पिंकलरचे दहा पाईप व चार नोजल चोरीला गेले आहेत त्यामुळे इतर शेतकऱ्यांमध्ये देखील आता सौर पंपाबद्दल चिंता निर्माण झाली असून, पोलिसासमोर देखील या चोरट्यांनी आव्हान उभे ठाकले आहे.कळंब तालुक्यामध्ये मुख्यमंत्री सोलार योजना, कुसुम सोलार योजना तसेच पंतप्रधान सोलार योजनेच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात असलेल्या विंधन विहिरीवर आणि बोरवेलवर सौर पंप बसवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा विजेचा खर्च बऱ्यापैकी वाचला असला तरी दुसरीकडे आता या चोरट्यांमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी सोलार प्लेट तर, काही ठिकाणी सोलार सिस्टिमचे स्टार्टर देखील चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी त्यासाठी या सौर पंप योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. मात्र चोरट्यांची नजर आता या सौर पंपाच्या प्लेटवर पडली आहे. त्यामुळे या चोरट्यांना तात्काळ पकडून या चोऱ्या थांबवण्याची विनंती पोलिसांकडे केली जात आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना आता सौर पंपाची राखण करण्यासाठी रात्र जागून काढावी लागणार आहे.शेतकरी यंदा जास्त पाऊस झाल्यामुळे दुहेरी संकटात सापडलेला आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे अनेक ठिकाणी आगात पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे जास्त पाऊसाचे संकट असतानाच आता दुसरीकडे सौर पंप चोरीला जात असल्याच्या घटना समोर येत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून या चोरट्यांचा बंदोबस्त केला जाईल का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे विशेष म्हणजे आत्तापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होऊनसुद्धा शोध अद्याप लागलेला नाही त्यामुळे पोलिसासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे कन्हेरवाडी शिवारात चोरीच्या घटना अनेक ठिकाणी घडतात याकडे पुर्णतः पोलिसांचे दुर्लक्ष दिसून येत आहे कारण पोलिसात तक्रार दाखल करूनही आतापर्यंत एकही शेतकऱ्यांच्या प्लेटां व वायरचा तपास लागलेला नाही त्यामुळे शेतकरी गुन्हे दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे समोर येत आहे चोरीला गेलेला प्लेटा व वायर नेमक्या जातात कुठे? त्याची विल्हेवाट कोठे लावली जाते? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तपास लागत नसल्याने चोरलेल्या प्लेटाची व वायरची विल्हेवाट लावण्यासाठी एखादे रॅकेट कार्यरत असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे स्वतः मा .पोलीस निरीक्षक साहेब यांनी सखोल तपास करावा अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.
[पंतप्रधान सौर पंप, कुसुम योजनेतून सौरपंप आणि मुख्यमंत्री सौर पंप या योजनेतून शेतकऱ्यांनी सौर पंप बसवलेले आहेत त्यामुळे विजेचा प्रश्न सुटला आहे मात्र संचाच्या प्लेटा व वायर चोरीला जातात व याची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली तरी तपास लागत नाही विशेष बाब आहे सध्या रब्बी पेरणीसाठी पिकाला पाणी देणे गरजेचे आहे अशा चोरीच्या घटना घडल्या तर शेतकरी अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे संचाला जीपीएस बसवणे गरजेचे आहे.
ॲड.रामराजे जाधव, सरपंच कन्हेरवाडी]
========================================
सौजन्य:
राधा कृष्ण
द वर्ल्ड ऑफ प्युअर व्हेज रेस्टॉरंट
जंत्रे प्लाझा च्या समोर जिजाऊ चौक ढोकी रोड कळंब,
अमित माळी, 9527197374
========================================
.jpg)


Post a Comment
0 Comments