Type Here to Get Search Results !

Team India Schedule: ऑस्ट्रेलिया दौरा संपला, आता टीम इंडियाचा पुढचा सामना कोणाशी? जाणून घ्या पूर्ण शेड्युल

Team India Schedule: ऑस्ट्रेलिया दौरा संपला, आता टीम इंडियाचा पुढचा सामना कोणाशी? जाणून घ्या पूर्ण शेड्युल




"अभय वार्ता" मुख्य संपादक जयनारायण दरक 


When is Team India next match: भारतीय क्रिकेट संघाचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. भारत या संघाविरुद्ध तिन्ही स्वरूपात खेळेल. कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा आधीच करण्यात आली आहे.

Team India Full Schedule Announced

Team India Full Schedule Announced: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी20 मालिकेनंतर भारतीय संघ आता पुढील मोहिमेची तयारी करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ५ सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली. ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणारा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्यामुळे मालिका भारताच्या नावावर राहिली. विशेष बाब म्हणजे, 2008 नंतर आजपर्यंत भारत ऑस्ट्रेलियात टी20 मालिका हरलेला नाही आणि हा विजयक्रम या दौऱ्यातही कायम ठेवण्यात आला. या दौऱ्यात भारतीय संघाने तीन वनडे सामनेही खेळले. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताला वनडे मालिकेत 1-2 अशी मागे रहावे लागले. आता भारतीय खेळाडूंना फारसा विश्रांतीचा कालावधी मिळणार नाही. कारण पुढील आठवड्यातच भारत साउथ अफ्रीका विरुद्ध घराच्या मैदानावर बहुप्रतीक्षित मालिका खेळणार आहे. या मालिकेत 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20 सामने होणार आहेत.

---------------------------------------------

सौजन्य;

 गायत्री फर्निचर कळंब

ऋषिकेश पांचाळ ,

8999547491

राजाभाऊ पांचाळ

9657771242


----------------------------------------------------------------------

टेस्ट मालिका वेळापत्रक

पहिली टेस्ट: 14 ते 18 नोव्हेंबर – ईडन गार्डन्स, कोलकाता

दुसरी टेस्ट: 22 ते 26 नोव्हेंबर – बरसापारा स्टेडियम, गुवाहाटी

टेस्ट मालिकेनंतर वनडे सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.



वनडे मालिका वेळापत्रक

पहिला वनडे: 30 नोव्हेंबर – रांची

दुसरा वनडे: 3 डिसेंबर – रायपूर

तिसरा वनडे: 6 डिसेंबर – विशाखापट्टणम




टी20 मालिका वेळापत्रक

पहिला टी20: 9 डिसेंबर – कटक

दुसरा टी20: 11 डिसेंबर – मुल्लांपुर

तिसरा टी20: 14 डिसेंबर – धर्मशाला

चौथा टी20: 17 डिसेंबर – लखनऊ

पाचवा टी20: 19 डिसेंबर – अहमदाबाद



भारतीय टेस्ट संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उप-कर्णधार/विकेटकीपर), यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नीतीश रेड्डी, 

मोहम्मद सिराज,कुलदीप यादव, आकाश दीप 

=========================================





Post a Comment

0 Comments