अभय वार्ता वृत्तसेवा /कळंब
जयनारायण दरक
कन्हेरवाडी शेती क्षेत्रात पिकवलेल्या शेतमालावर शेतकर्यांनी स्वतः प्रक्रिया करायला हव्यात, त्यापासून उत्पादित पदार्थांची स्वतः विक्री करायला हवी! असा सल्ला दिला जातो. याच मार्गाने जात कन्हेरवाडी येथील प्रयोगशील शेतकरी यांनी अॅड रामराजे जाधव यांनी अत्याधुनिक गुर्हाळ उभारत केमिकलमुक्त अशा ऑरगॅनिक गूळ व इतर पदार्थांची निर्मिती करत स्वतःचा ब्रॅण्डींग केली आहे. शेती क्षेत्रातील या प्रयोगाचे सर्वस्तरावर कौतुक होत आहे.
आदर्श गाव कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सरपंच अॅड रामराजे नागुराव जाधव हे कायद्याचे पदविधर, पण शेती क्षेत्रात त्यांचे एखाद्या 'कृषि' पदवीधरापेक्षा जास्त कार्य. शेतात सातत्यानं नवीन प्रयोग, पीके घेण्याकडे त्यांचा कल.
ते गुर्हाळघर चालक पण. मागच्या अनेक वर्षापासून ते स्वतः पिकवलेला ऊस, स्वतःच्या गुर्हाळघरात गाळप करत आले आहेत. तसे पाहिलं तर गावाची पण 'गुर्हाळघराचे गाव' अशीच ओळख. गावात तीसेक गुर्हाळ घरे. पण अलिकडे मजुरांची समस्या, गुळाचा भाव यामुळे या गुर्हाळघरांना घरघर लागलेली.
यास्थितीत हार न मानणार्या रामराजे जाधव यांनी पारंपारिक गुर्हाळ घराच्या बाहेर पडत एका अत्याधुनिक 'जॉग्वरी प्रॉडक्शन'ला वास्तवात आणले आहे. मोठा खर्च करत अत्याधुनिक गुर्हाळ घर उभारले आहे. शिवाय यातून उत्पादित होणारा माल ऑरगॅनिक व ग्राहकांच्या मागणीनुसार 'कस्टमाईज' स्वरूपात उपलब्ध राहणार आहे.
अत्याधुनिक, स्वयंचलित
रामराजे जाधव यांचे गुर्हाळ घर अत्याधुनिक आहे. विविध स्वयंचलित यंत्रसामग्री वापरल्या आहेत. यांमुळे मनुष्यबळ अत्यल्प लागत आहे. चरक ते गुळनिर्मिती इथवर बहुतांश काम मनुष्यविरहीत होतेय. यामुळे आहे त्या कच्च्या मालात, अधिक उत्पादन शक्य झाले. याशिवाय विविध आकारात, विविध फ्लेवरमध्ये गूळ उपलब्ध होणार आहे.
केमिकलमुक्त गूळाची निर्मिती
सध्या बाजारात मिळणारा गुल रसायनयुक्त आहे .यातही अनेक ठिकाणी बनावट गुळ विकला जातो . अशा स्तिथीत ग्राहकांना दर्जेदार ,पाटील नैसर्गिक तत्वांनी परिपूर्ण असा गुळ मिल्ने दुरापास्त झाले आहे . या अनुषंगाने रामराजे जाधव यांनी आपल्या नव्या गुळ निर्मिती उद्योगात केमिकलमुक्त असा पूर्णतः 'ऑरगॅनिक 'गुल उत्पादन सुरु केले आहे .
उसाचा गोडवा पण सेंद्रियच
ऍड रामराजे जाधव हे कन्हेरवाडी येथील प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी .त्यांनी आपल्या गुऱ्हाळघरात ऑरगॅनिक गुळाचे उत्पादान घेण्याचा संकल्प केला . यायासाठी खात्रीचा कच्चा माल म्हणजे ऊस मिळणे आवश्यक होते .त्याकरिता स्वतःच्या शेतजमिनीत २५ एकर सेंद्रिय उसाची लागवड करून जोपासना केली .आज याच फडातील ऊस त्याच्या गुऱ्हाळ घरातीळ गाळपासाठी उपलब्ध आहे .
अस्सल : मानकांनुसार प्रमाणित
ऍड रामराजे जाधव यांनी आपले ऑरगॅनिक गुल व इतर तत्सम गुळाचे पदार्थ ग्राहकाभिमुख ,दर्जेदार व खात्रीलायकया असावेत यासाठी सर्व प्रचलित मानकानुसार प्रमाणके ,अनुमत्या घेतल्या आहेत .यामुळे कन्हेरवाडी येथील उत्पादितही गुळ स्थानिक बाजारपेठेसह परदेशात पण विक्री करण्याचे नियोजन असलेच्या रामराजे जाधव यांनी संगीतले.
स्वतःचा ब्रँड ; विविध उत्पादने
ऍड रामराजे जाधव यांनी आपल्या नव्या व अत्याधुनिक गुऱ्हाळ घरातून उत्पादित केले जाणाऱ्या 'प्रॉडक्ट'ची स्वतःच्या नावाने ब्रॅण्डिंग केली आहे यासाठी त्यांनी आवश्यक त्या नोंदणी करत 'ऑर्गिबेस्ट' या नावाचा ब्रँड स्थापित केला आहे.यादवारे गुल ढेप ,गुल पावडर , लिक्विड अथवा काकवी , लहान आकाराच्या ट्रॉफी अशे एकूण दहा पदार्थ निर्मिती केले जाताहेत .
यांच्या उपस्तितीत झाले उदघाटन ...
कण्हेवाडी येथे नुकतेच जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या हास्ते उदघाट्न करण्यात आले .यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दत्त कुलकर्णी , माजी सभापती अशोक तांबारे ,भाजप तालुकाध्यक्ष अरुण चौधरी ,मोहेकर अग्रोचे हनुमंत मडके , डॉ संदीप तांबारे ,माजी पस सभापती दत्ता साळुंखे , संदीप मडके ,कन्हेरवाडीचे उपसरपंच विजय कवडे , मदन बारकूल , बालाजी अडसूळ , प्रणव चव्हाण ,पद्माकर पाटील , संदीप तांदळे , महादेव पावले , नेमिनाथ इंगोले आदी मोठ्या संख्येने उपस्तित होते
=======================================



Post a Comment
0 Comments