वाटा खारीचा- सहभाग चित्रकरांचा या संकल्पनेतून साडेसातशे विद्यार्थ्यांना आर्टिस्ट ग्रुप व रंगसमर्थ फाउंडेशन पुणे च्या वतीने मदतअभय वार्ता वृत्तसेवा/ कळंब
जयनारायण दरक
कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सात्रा, उबाळेवस्ती, खोंदला, आथर्डी, आडसुळवाडी,बहुला, गंभीरवाडी, गायरानवस्ती ईटकुर, महादेवनगर कोठाळवाडी, घोगावती ईटकुर या शाळेतील जवळपास 750 विद्यार्थ्यांना मांजरा व वाशीरा नदीच्या काठावर वसलेल्या अतिवृष्टी ग्रस्त गावातील या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आर्टिस्ट ग्रुप व रंगसमर्थ फाउंडेशन पुणे यांच्या वतीने उत्तम अशा प्रकारचे शालेय दप्तर (सॅग),वह्या व कंपास चे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झाला. माणुसकीची भिंत - एक कर्तव्य, वाटा खारीचा - सहभाग चित्रकारांचा* या संकल्पनेतून सदरील फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मदत केली.
याप्रसंगी सुरेंद्र पाटील संकल्पक पुणे आर्टिस्ट कृषीभुषण नितीन आण्णा थोरात, गणेश केंजळे अध्यक्ष रंगसमर्थ फाउंडेशन पुणे,चित्रकार रणधीन खवले, अमित जोशी, चित्रकार कैलास, सतीश उपळावीकर , अंकुश कानगुडे, स्वप्निल कुयते व मंडळाचे सदस्य, शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी, केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या उपस्थितीमध्ये सदरील साहित्याचे वाटप करण्यात आले.
शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, शिक्षण प्रेमी नागरिक यांनी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. सदरील शैक्षणिक साहित्याची मदत ही उपक्रमशील मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड व हभप महादेव महाराज आडसूळ यांच्या समन्वयातून प्राप्त झाली आहे.
=======================================
सौजन्य:
राधा कृष्ण
द वर्ल्ड ऑफ प्युअर व्हेज रेस्टॉरंट
जंत्रे प्लाझा च्या समोर जिजाऊ चौक ढोकी रोड कळंब,
अमित माळी, 9527197374
======================================


Post a Comment
0 Comments