Type Here to Get Search Results !

परंडा नगरपरिषदेत राजकीय राडा; सावंत आणि मोटे गट भिडले, जोरदार दगडफेक

परंडा नगरपरिषदेत राजकीय राडा; सावंत आणि मोटे गट भिडले, जोरदार दगडफेक






अभय वार्ता वृत्तसेवा /परंडा



जयनारायण दरक 


परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय वातावरण काल चांगलीच तापल्याचे पाहायला मिळाले.


नामनिर्देशन अर्जावरील आक्षेपाच्या कारणावरून मंत्री तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांचे गट आमनेसामने आले.


यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार वादावादी होऊन त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, परंडा नगरपरिषदेत निवडणूक प्रक्रियेदरम्यान अर्जाची छाननी सुरू असताना हा प्रकार घडला. 


शिवसेना शिंदे गट व सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीचे कार्यकर्ते परस्परांना भिडले. तानाजी सावंत गटाचे उमेदवार झाकीर सौदागर विश्वजीत पाटील यांच्यात सुरुवातीला अर्जावर आक्षेप घेण्यावरून शाब्दिक चकमक झाली.

या वादाचे पर्यावसान लवकरच मोठ्या गोंधळात झाले. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने परिस्थितीची चिघळली आणि दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली.

या घटनेमुळे परंडा नगरपरिषद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

राजकीय वैमनस्यातून घडलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

========================================



Post a Comment

0 Comments