.jpg)
मौजे.सारोळा मांडवा,सेलू ई. के.वाय.सी कॅम्प मुळे शेतकऱ्यांना दिलासा.
अभय वार्ता वृत्तसेवा /वाशी
जयनारायण दरक
मागील महिन्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मदत अनुदान यादी शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या होत्या. परंतु काही स्थलांतरित सामाईक शेतकरी बांधव फार्मर आयडी तांत्रिक अडचणीमुळे फार्मर आयडी प्रलंबित असल्यामुळे काही शेतकऱ्यांना अनुदान खात्यावर जमा झाले नव्हते परंतु नुकतेच शासनाने ई. के.वाय.सी साईट सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांनी ई. के.वाय.सी पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे.ई. के.वाय.सी पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान खात्यावर जमा होत आहे.व त्यामुळे शेतकऱ्यांना काय त्रुटी आहेत हे लक्षात येत आहेत.त्यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाची वातावरण आहे.
तसेच सर्व शेतकऱ्यांनी आपले फॉर्मर आयडी कार्ड काढून घ्यावे. त्यामुळे आपल्याला पुढील काळात ई.के.वाय.सी करण्याची आवश्यकता भासणार नाही. व सर्व मदत तत्काळ मिळणे सुलभ होईल.समाईक, स्थलांतरित असलेल्या खातेदारांनी लवकरात लवकर कागदपत्र जमा करावी.तसेच मयत खातेदारांनी आपल्या वारसाची नोंद सातबारा सदरी लावून घ्यावी.सर्वांनी ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी.तसेच पुढील काळात नैसर्गिक आपत्ती पासून पिकाचे नुकसान टाळण्यासाठी रब्बी हंगामात देखील पिक विमा योजनेत सहभाग नोंदवावा.असे आव्हान ग्राम महसूल अधिकारी डि.व्ही.सिरसेवाड पाटील यांनी केले.
========================================
सौजन्य;
गायत्री फर्निचर कळंब
ऋषिकेश पांचाळ ,
8999547491
राजाभाऊ पांचाळ
9657771242
========================================
.jpg)
.jpg)
Post a Comment
0 Comments