गतिरोधकाअभावी पुन्हा रक्तरंजित अपघात — संतप्त कुटुंबीयांचा मृतदेह घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आक्रोशअभय वार्ता वृत्तसेवा /कळंब
जयनारायण दरक
कळंब-ढोकी महामार्गावर गतिरोधक नसल्यामुळे पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून श्रीमंत भैरू काळे (रा. मंगरूळ) यांचा जागीच मृत्यू झाला. चार चाकी गाडी क्रमांक MH 25AS 4012 या गाडीने त्यांना जोरदार धडक दिली या दुर्घटनेमुळे कळंब तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
दररोज छोटे-मोठे अपघात घडणाऱ्या या कळंब ढोकी मार्गावरील जवळा पाटी आणि मंगरूळ पाटी या ठिकाणी प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे. नुकताच याच परिसरात पांडुरंग भैरू काळे गंभीर जखमी झाले होते, आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचे भाऊ श्रीमंत काळे यांचा जीव गेला — यातून कुटुंबीयांचा व नातेवाईकांचा संताप उसळला.
संतप्त कुटुंबीयांनी मृतदेह घेऊन कळंब येथील सार्वजनिक बांधकाम विभागासमोर तीव्र आंदोलन छेडले. “या मृत्यूला जबाबदार कोण?” असा थेट सवाल प्रशासनाला विचारण्यात आला.
दीर्घ तणावानंतर अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत आठ दिवसांत गतिरोधक बसविण्याचे मान्य केले, त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे नेला. आणि अंत्यसंस्कार करण्यात आले
========================================

Post a Comment
0 Comments