Type Here to Get Search Results !

500 महिला शेतकऱ्यांना हरभरा बियानांचे वाटप, पुण्यधाम ट्रस्ट ची मदत 

500 महिला शेतकऱ्यांना हरभरा बियानांचे वाटप, पुण्यधाम ट्रस्ट ची मदत 






अभय वार्ता वृत्तसेवा /कळंब 


जयनारायण दरक 



धाराशिव जिल्ह्यातील 500 पूरग्रस्त विधवा, परितक्ता, एकल महिलांना पुण्यधाम ट्रस्ट संचलीत पुण्यधाम आश्रम पुणे यांनी रब्बीच्या पेरणीसाठी हरभरा बियानांचे वाटप दि. 06 नोव्हेंबर रोजी पर्याय सामाजिक संस्था हसेगाव (के) येथे करण्यात आले, पुण्यधाम च्या माता कृष्ण कश्यप आणि पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पुण्यधाम धाम चे ट्रस्टी गणेश कामठे म्हणाले की, आपण समाजाचे कांही तरी देणे लागतो त्यामुळं आज आपण संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे आश्रू पुसले पाहिजेत असे वाटले आणि या बियाणे वाटपाचे काम हाती घेतले, आपण शेतकरी या जगाचे पोशिंदे आहोत, आपण कोणापुढेही हात पसरणारे नाहीत, आम्ही या पुढे सुद्धा पुण्यधाम कडून 1000 टक्के मदत करू असे सांगितले, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाम मरळ, सूर्यकांत कामठे, निलेश काकडे हे उपस्थित होते.

 पर्याय चे कार्यवाहक विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी अध्यक्षीय भाषण केले, बाळासाहेब धस, विलास गोडगे, सुनंदा खराटे यांनी मार्गदर्शन केले तसेच ऋषिकेश तोडकर यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिताताई तोडकर, भिकाजी जाधव, बालाजी शेंडगे, परमेश्वर गवारे, विकास कुदळे, प्रमिला राख, आनंद जाधव, कल्पना जतकर, अश्विनी काकडे, निकिता चंदनशिवे, शकुंतला गोडगे, जयश्री कोठावळे, रियाज शेख, अशोक शिंदे, अजहर तुटके, दिगंबर लडके यांनी विशेष परिश्रम घेतले.

========================================

सौजन्य:

 राधा कृष्ण

 द वर्ल्ड ऑफ प्युअर व्हेज रेस्टॉरंट 

 जंत्रे प्लाझा च्या समोर जिजाऊ चौक ढोकी रोड कळंब,

 अमित माळी, 9527197374




Post a Comment

0 Comments